भारतातील लेह-लडाखपासून सातासमुद्रापार किर्गिस्तानपर्यंत आज. मंगळवारी भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सिस्मॉलॉजिकल सेंटर ऑफ इंडिया आणि जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओ सायन्सेस यांनी ही माहिती दिली.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार लद्दाखची राजधानी लेह येथे पहाटे 5:39 वाजता झालेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.4 इतकी नोंदवण्यात आली. सध्या तरी या भूकंपामुळे कुठल्याही जिवीत किंवा वित्त हानीचे वृत्त नाही. दुसरीकडे, जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओ सायन्सेसच्या म्हणण्यानुसार, मंगळवारी किर्गिस्तान-झिनजियांग सीमा भागात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6 इतकी मोजली गेली. भूकंपामुळे जीवित वा वित्तहानी झाली आहे का, याबाबतची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. हा भूकंप 10 किलोमीटर खोलीवर होता.