सोलापूर : पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालया कडून वाचनालय सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आज रोजी विविध कार्यक्रमांतर्गत भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते चित्रकला स्पर्धेची सुरुवात पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव माननीय दशरथ गोप यांच्या शुभहस्ते सरस्वती प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आले.
यावेळी पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय ॲड. श्रीनिवास क्यातम व सोलापूर विद्यापीठ दृश्यकला विभागाचे एचओडी माननीय श्री धनंजय टाकळीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रमुख पाहुणे माननीय दशरथ गोप यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सध्याच्या युगात स्पर्धेला महत्त्व असून अनेक स्पर्धातून विद्यार्थ्यांमध्ये आपले कलागुण व्यक्त होतात आणि ते त्यांच्या पुढील आयुष्यात उपयोगी ठरतात म्हणून अशा स्पर्धा होणे गरजेचे असतात असे व्यक्त केले.
यावेळी पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष पांडुरंग दिड्डी, उपाध्यक्ष देविदास गोटीपामूल, कार्यवाहक अरविंद चिन्नी, सहकार्यवाह विजयकुमार गुल्लापल्ली, खजिनदार विष्णू कारमपुरी, सांस्कृतिक प्रमुख सौ. गीता सादूल इत्यादी पदाधिकारी तसेच विश्वस्त वासुदेव इप्पलपल्ली, आनंद वल्लाकाठी, लक्ष्मीनारायण कुचन, श्रीनिवास यनगंदूल, पद्मशाली शिक्षण संस्थेचे विश्वस्त श्रीधर चिट्याल, मुख्याध्यापक अजिता पिलाई,कल्पना दासरी, मंजुळा कुडक्याल,उपप्राचार्य अनिल निंबाळकर, उपमु्ख्याध्यापक मधुकर धर्मसाले, तुकाराम श्रीराम,पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू,परमेश्वर बाबलसुरे,शावरप्पा पुजारी, पद्मशाली शिक्षण संस्थेतील शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी इत्यादींची उपस्थिती होती.
चित्रकला स्पर्धा एकूण सहा गटात घेण्यात आली. इयत्ता पहिली ते महाविद्यालयीन गटासाठी रंगभरण, फुले विकणारा व मुले, पतंग उडवणारी मुले, वाचन करणारी मुले, पावसात नाचणारी मुले, वृक्षारोपण, शालेय परिसर स्वच्छ करणारी मुले, महाविद्यालयीन गटासाठी प्रदूषण एक जागतिक समस्या, रक्तदान, वाचन संस्कृती काळाची गरज इत्यादी विविध विषयावर स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत एकूण 1460 इतक्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्पर्धा प्रमुख विजयकुमार गुल्लापल्ली व प्रा. श्रीनिवास मद्राल तसेच सहप्रमुख म्हणून नितीन मिरजकर, जगदीश परांडकर यांनी काम पाहिले स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कार्यालयीन कर्मचारी सौ रमा इप्पलपल्ली श्रीमती वनिता कायत, प्रा. काशिनाथ कोळी, सौ कल्पना नल्ला इत्यादींनी परिश्रम घेतले.

























