सोलापूर – कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखानाश्रीपुर येथे कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या पुर्णाकृती पुतळा अनावरण सोहळा व १०००० मे.टन विस्तारीकरण गाळप व पोटॅश निर्माती प्रकल्पाच्या शुभारंभ कार्यक्रम महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी उपमुख्यमंत्री मा.विजयसिंह मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या प्रसंगी माढा लोकसभा खा. धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोलापूर जिल्हा व माढा लोकसभा कार्यक्षेत्रातील विकासाच्या विविध प्रस्तावांबाबत निवेदन सादर केले.
यावेळेस सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक जिल्ह्यातील आजी-माजी लोकप्रतिनिधी व मान्यवर उपस्थित होते.
निवेदनातील प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे
1️⃣ मोडनिंब येथे गतिशक्ती मल्टी मॉडेल कार्गो टर्मिनल विकसित करणे.
→ मध्य रेल्वे सोलापूर विभागातील मोडनिंब स्थानक हे भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाचे असून, तेथे GCT उभारल्यास औद्योगिक विकासाला चालना मिळेल.
2️⃣ जीआयएस व जनरेटिव्ह एआय आधारित शेतकरी केंद्रित सिंचन व्यवस्थापन पायलट प्रकल्प उजनी धरण प्रकल्प क्षेत्रात राबविणे.
→ या प्रणालीद्वारे पाण्याचा कार्यक्षम वापर, पिकानुसार सिंचन नियोजन व उत्पादनवाढ साध्य होईल.
3️⃣ मौजे शेलगाव (वां), ता. करमाळा येथे केळी संशोधन केंद्र स्थापन करणे.
→ सोलापूर जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान व संशोधनाचा लाभ मिळावा यासाठी हा उपक्रम.
4️⃣ केळी हे पीक “भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेत” समाविष्ट करण्याची मागणी.
→ शेतकऱ्यांना आर्थिक साहाय्य व संरक्षण मिळावे यासाठी ही विनंती.
5️⃣ तीर्थक्षेत्र देहू – पंढरपूर दरम्यान नवीन मेमू रेल्वेगाडी सुरू करणे.
→ भाविक व यात्रेकरूंसाठी हा मार्ग सोयीचा ठरावा म्हणून केंद्र शासनाकडे पाठपुरावा.
6️⃣ प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (PMKSY) अंतर्गत नीरा-देवघर प्रकल्पासाठी निधी मिळविण्यासाठी PIB कडे पाठपुरावा.
7️⃣ प्रलंबित पंढरपूर–लोणंद व जेऊर–आष्टी रेल्वे प्रकल्प तातडीने पूर्ण करणे.
→ ग्रामीण भागातील संपर्क
सुविधा वाढविण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा.
8️⃣ आंतरराष्ट्रीय डेफ (श्रवण अपंग) खेळाडूंना रोख रक्कम प्रोत्साहन धोरणाचा लाभ देणे.
→ श्रवण अपंग खेळाडूंचे मनोबल वाढविण्यासाठी केंद्र व राज्य स्तरावर हा निर्णय आवश्यक.