सोलापूर : खासदार झालेल्या प्रणिती शिंदे यांनी महाराष्ट्रात जी अतिवृष्टी परिस्थिती निर्माण झाली होती शेतकऱ्यांचा अति नुकसान झालं होतं त्या दुःखात सहभागी होण्याऐवजी खासदार प्रणिती शिंदे यांनी अतिवृष्टी ही सरकार मुळे आली आहे असे बेताल वक्तव्य करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केलं होतं. याचा निषेध म्हणून भाजप नेते अनंत जाधव यांच्या वतीने गेट वेल सून खासदार प्रणिती शिंदे असे म्हणत अनोख्या पद्धतीने आंदोलन केले.
खासदार प्रणिती शिंदे यांचे नाव न घेता, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी आवाहन केलं होतं. त्यांच्या मानसिकतेवर झालेला परिणाम पाहता, त्यांना एक फुल देऊन गेट वेल सून म्हणून त्यांच्या मानसिकतेत बदल व्हावा. हे त्यांच्यासाठी फार पूरक आहे. हाच धागा पकडत भाजप नेते अनंत जाधव यांनी खासदार प्रणिती शिंदे वर टीका करताना म्हणाले, प्रणिती ताई आपण सोलापूरच्या खासदार आहात देशात राज्यात शेतकऱ्यांची परिस्थिती नाजूक असताना आपण आपल्या पक्षाने जी जबाबदारी दिली आहे बिहारमध्ये आपण मजा घेतात पण सोलापूरचा शेतकरी सजा भोगतोय. आपल्या मानसिक तेत बदल करावा, आपण देशाचे गृहमंत्री राहिलेलं सुशीलकुमार शिंदे यांच्या मुलगी आहात त्यांच्या पदाला शोभेल असे वक्तव्य आपण करावं, अशी माफक अपेक्षा होती परंतु आपल्या मानसिकतेत काही बदल दिसत नाही. आपण खासदार झाल्यापासून बेताल वक्तव्य करता, फक्त मीडिया समोर चमकुगिरी करता. आपल्याला एका बौद्धिक क्लासची गरज आहे रामभाऊ म्हाळगी प्रबोधनी आहे तेथे सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिलं जातं त्यांच्या बौद्धिक सुधारणा व्हावी यासाठी लक्ष दिले जाते. तेथे आपण बौद्धिक चा क्लास लावावा अशी विनंती भाजपचे नेते अनंत जाधव यांनी केली.
यावेळी माजी नगरसेवक विनायक विटकर, गणेश साखरे, देविदास चेळेकर, गोपाल झंवर, गौतम कसबे, मनोज मडकूनाईक, चेतन शर्मा, गिरीश ममाने, बाळू दरक, सचिन कुलकर्णी, हिरा आटे, नितीन कुलकर्णी, दिनेश दांगडे, अनिकेत अलकुंटे, अप्पा बुरांडे, नेताजी जाधव, अनिकेत आवताडे, सूरज भोसले, अविनाश सुरवसे, कुणाल शिंदे, आदर्श बंडगर, मंजु बोरगावकर, बालाजी भिंगारे, श्रीकांत कट्टीमनी, आदींसह भाजप नेते अनंत जाधव मित्र परिवारातील सदस्य उपस्थित होते.

















