दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निकटवर्तीयांकडे आज, मंगळवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) धाडी टाकल्या आहेत. यामध्ये केजरीवाल यांचा स्वीय सहायक वैभव, आम आदमी पक्षाचे खासदार एन.डी. गुप्ता आणि इतर नेत्यांचा समावेश आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात ही कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
मनी लाँड्रिंगप्रकरणी ईडी सातत्याने कारवाई करत आहे. त्याअंतर्गत आज, मंगळवारी ईडीने आर्थिक गैरव्यावहार प्रकरणी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टीशी संबंधित इतरावर कारवाई करत छापेमारी केली आहे. आपचे खासदार एनडी गुप्ता यांच्या दिल्लीतील घरावर ईडीचा छापेमारी सुरु आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ईडी मनी लाँड्रिंगच्या चौकशीचा एक भाग म्हणून आम आदमी पार्टीशी संबंधित असलेल्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या वैयक्तिक सचिवांच्या निवासस्थानासह सुमारे 10 ठिकाणी शोध मोहिम (सर्चिंग ऑपरेशन) हाती घेतले आहे.