माळशिरस – शिक्षण हाच विकासाचा पाया असून त्यासाठी ध्येय,मेहनत,जिद्द असावी लागते सध्याची पिढी मोबाईल,सोशल मिडिया मध्ये गुरफटली असून हि बाब धोकादायक असून पालकांनी त्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन नूतन डिवाय एस पी प्रदीप गोरड यांनी केले.
तरंगफळ ता. माळशिरस येथे राजमाता रत्नप्रभादेवी मोहिते पाटील बहुउदेशिय अपंग विकास संस्थेच्या वतीने दिव्यांग दिन व माळशिरस तालुक्यातील वर्ग एक अधिकाऱ्यांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता यावेळी बोलताना त्यांनी केले.
यावेळी पायलट कल्याणी शिंदे,सागर रणनवरे . दिपाली खरात. सायली पराडे. काजल भोसले. ज्ञानेश्वरी पवार . पै . दत्ता मगर .मच्छिंद्र गोरड .अजय तरंगे ग्रामपंचायतीच्या सरपंच पद्मिनी तरंगे . संस्थेचे अध्यक्ष गोरख जानकर ग्रांपसदस्या जगुबाई जानकर . गोविंद कर्णवर महेश पिंगळे शशीकांत साळवे. अॅड शांतीलाल तरंगे आदी उपस्थित होते.यावेळी मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याच वाटप करण्यात आले .
यावेळी बोलताना नूतन पायलट कल्याणी शिंदे म्हणाल्या की मी ग्रामीण भागातील आहे तिथे सुविधा नव्हत्या पण वडिलांचे स्वप्न होतं मी पायलट व्हावं मी जिद्द व चिकाटी ठेवली व ध्येय साध्य केलं.यावेळी संस्थेचे अध्यक्ष गोरख जानकर यांनी संस्थेच्या कामाचा आढावा घेतला . प्रारंभी ग्रामपंचायतच्या वतीने दिव्यांगांसाठी पाच टक्के निधीचे वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष साठे यांनी केले तर आभार सूजित तरंगे यांनी मानले.

















