माढा – विठ्ठल प्रतिष्ठान संचलित आर्या पब्लिक स्कूल माढा या शाळेतील इयत्ता सहावी ते दहावीतील विद्यार्थ्यांनी बबनराव शिंदे शुगर अॅण्ड अलाइड्स इंडस्ट्रीज लिमिटेड, तुर्कपिंपरी येथे शैक्षणिक भेट दिली. या भेटीचा उद्देश विद्यार्थ्यांना ऊस प्रक्रिया, साखर उत्पादन, उद्योग व्यवस्थापन तसेच कारखान्यातील विविध यंत्रसामग्रीची प्रत्यक्ष माहिती करून देणे हा होता.
कारखान्याचे व्यवस्थापक कैलास मते गिराम आणि हांडे यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले व प्रदीप लटके ,अक्षय पांढरे ,हेमंत कांबळे, शंकर तहसीलदार, दत्ता कदम ,अशोक कदम, दत्तात्रय चव्हाण यांनी संपूर्ण कारखान्याची माहिती दिली. ऊस तोलणी, क्रशिंग, ज्यूस एक्स्ट्रॅक्शन, बॉयलर विभाग, पॅन विभाग, साखर सुकवणी, पॅकिंग प्रक्रिया इत्यादी सर्व विभागांची विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने पाळावयाच्या नियमांची मार्गदर्शनात्मक माहितीही देण्यात आली.
या भेटीमुळे विद्यार्थ्यांच्या औद्योगिक ज्ञानात भर पडल्याचे मत शाळेचे प्राचार्य प्रा.सागर थोरात यांनी मत व्यक्त केले व कारखाना व्यवस्थापनाचे आभार मानून अशा शैक्षणिक उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळतो, ज्यामुळे त्यांच्या करिअरविषयक दृष्टीकोनात सकारात्मक बदल घडतो, असे सांगितले.
सोलापूर जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजित शिंदे शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा प्रणिताताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले. संस्थेचे प्रतिनिधी संभाजी पाटील,सहल विभागाचे प्रमुख दत्तात्रय चव्हाण ,मनोज नागटिळक,जयदेव गायकवाड, अतुल लंकेश्वर, रोहित भांगे, शुभम पूरवत, संध्या सरडे, वंदना गोसावी यांनी यशस्वीपणे पार पाडली.



















