सोलापूर : पुणे येथे होणाऱ्या विभागीय मैदानी स्पर्धेसाठी 17 वर्षे खालील व 14 वर्षाखालील मुलांच्या गटात सेंट जोसेफ हायस्कूलच्या आठ खेळाडूंची निवड झाली आहे सतरा वर्षाखालील गटात वसंत वाघमोडे याने 100 मीटर धावणे या प्रकारात प्रथम क्रमांक पटकावित वेगवान धावपटू चा मान मिळवला त्यांनी 200 मीटर धावणे व लांब उडी तर रिले या प्रकारात प्रथम क्रमांक पटकाविचार सुवर्ण पदकांचा चौकार लावला.
सर्व खेळाडूंना क्रीडाशिक्षक सनी भोसले यांचे मार्गदर्शन लाभले . मुख्याध्यापक फादर अनंद गायकवाड यांनी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या
चारोळी मिळवलेले यश पुढीलप्रमाणे आहे : १७ वर्षांखालील मुलांच्या गटात ४ X १०० मीटर रेले मध्ये पहिले स्थान मिळवले असून संघातील खेळाडू : १) वसंत वागमोडे २) मोहम्मद सफा खतीब ३) अथर्व संतोष गायकवाड ४) विश्व भोगडे ५) सिद्धराम बोगा यांनी सुवर्ण जिंकला.
१४ वर्षांखालील मुलांच्या गटात ४ X १०० मीटर रेले मध्येही प्रथम स्थान मिळवले असून संघातील खेळाडू १) प्रणव माडगुंडी २) रिधान गायकवाड ३) समर्थ शिंगाडे ४) मोहम्मद तजैन शेख यांनी सुवर्ण जिंकला
१७ वर्षांखालील मुलांच्या गटात मोहम्मद सफा झाकीर हुसेन खतीब याने १०० मीटर धावणे (रौप्य पदक), १४ वर्षांखालील मुलांच्या गटात प्रणव माडगुंडी १०० मीटर धावणे (रौप्य) तर रिधान गायकवाड १०० मीटर धावणे (कांस्या, १४ वर्षांखालील मुलींच्या गटात श्रुष्टी जाधव हिने गोळाफेकमध्ये रौप्य पदक पटकावले.


















