नांदेड / ईस्लापुर – किनवट तालुक्यातील ईस्लापुर येथे भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल, यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आज रोजी इस्लापूर पोलीस स्टेशनच्या वतीने एकता दौड ( रन फॉर युनिटी ) असा कार्यक्रम आयोजन करण्यात येऊन आज सकाळी साडेसहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सावरकर नगर नाकापर्यंत एकता दौड करण्यात आली .
एकता दौड मध्ये गावातील प्रतिष्ठित नागरिक , पत्रकार , पोलीस पाटील , पोलीस आमलदार ‘ यांचा सहभाग होता एकता दौड संपल्यानंतर ईस्लापूर पोलीस स्टेशनचे साहायक पोलीस निरीक्षक उमेश भोसले ‘ यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवन चरित्रावर नागरीकांना सखोल माहिती देऊन सर्वांचे आभार मानले .
 
	    	 
                                




















 
                