तभा फ्लॅश न्यूज/टेंभुर्णी : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रभाग रचने संदर्भातील आदेश तहसीलदारांनी सादर केलेल्या गट रचनेच्या आधारे जिल्हाधिकारी यांनी निर्गमित केले असून जाफराबाद तालुक्यात करण्यात आलेल्या प्रभाग रचनेत मोठ्या प्रमाणावर फेरबदल झाल्याचे दिसत आहे.
जाहीर करण्यात आलेली प्रभाग रचना ही प्रशासनाने काही राजकीय पक्ष आणि काही विशिष्ट लोकांच्या चांगभल्यासाठी करण्यात आल्याचे सकृत दर्शनी दिसत आहे. यापूर्वी टेंभुर्णी गटात समाविष्ट असणारी गावे सिपोरा अंभोरा गटात समाविष्ट करण्यात आली असून सिपोरा अंभोरा गटात समाविष्ट असणारी गावे राजकीय फायद्यासाठी टेंभुर्णी जिल्हा परिषद गटात समाविष्ट करण्यात आल्याचे दिसत आहे.
जाहीर करण्यात आलेले प्रभागरचने नुसार टेंभुर्णी जिल्हा परिषद गटात टेंभुर्णी हा एक गण आणि काळेगाव असे दोन गण असतील. टेंभुर्णी गणात टेंभुर्णी आणि गणेशपुर तर काळेगाव गणात काळेगाव, भातोडी,खानापूर, शिराळा, डोलखेडा, नांदखेडा, काचनेरा,किन्ही, वाढोणा,वरखेडा फिरंगी या गावांचा समावेश करण्यात आला आहे. सदर गट रचना करताना प्रशासनाने नेमका कोणता निकष लावला हे न उलगडणारे कोडे आहे.आपल्या विचारांची असणारी गावे सिपोरा गटातून काढून राजकीय फायद्यासाठी टेंभुर्णी गटात समाविष्ट करण्यात आली आहेत.सिपोरा अंभोरा गटामध्ये सिपोरा आणि सावरगाव म्हस्के हे दोन गण असतील. सिपोरा गणात देऊळझरी, ब्रह्मपुरी, मंगरूळ, हनुमंतखेडा, आळंद, हिवरा काबली या गावांचा समावेश आहे तर सावरगाव मस्के या गणामध्ये सावरगाव, कुंभारझरी, गोंधनखेडा, सावंगी, डावरगाव, टाकळी, गारखेडा,निमखेडा आणि नळविहीरा या गावांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे पूर्णा नदीच्या पलीकडील असलेल्या टाकळी गारखेडा डावरगाव या गावांचा सिपोरा गटात समावेश करताना नेमका कोणता साक्षात्कार प्रशासनाला झाला हे ही न उघडलेलं कोडे आहे. अकोला देवगटामध्ये अकोला देव आणि डोणगाव हे दोन गण असतील अकोला देव गणात अकोला देवसह दहिगाव, तपोवन गोंधन,आंबेगाव, तोंडोळी या गावांचा समावेश आहे. डोणगाव गणात डोणगाव सह पोखरी, बुटखेडा, सातेफळ, निवडुंगा या गावांचा समावेश आहे.माहोरा जिल्हा परिषद गटात माहोरा आणि खासगाव हे दोन गण असतील खासगाव गणात खासगाव सह जानेफळ पंडित कुंभारी खापरखेडा, बोरगाव बुद्रुक,सवासनी मेरखेडा ही गावे तर माहोरा गणात माहोरासह बेलोरा, चापनेर धोंडखेडा,कोल्हापूर, भोरखेडा या गावांचा समावेश राहील. वरूड बुद्रुक गटात वरुड बुद्रुक आणि भारज खुर्द हे दोन गण असतील.
वरूड गणामध्ये वरुड सह कोळेगाव, सोनगिरी, सांजोळ, भराडखेडा , कोनड, बुद्रुक,सोनखेडा, सावरखेडा गोंधन तर भारज खुर्द गणात भारज खुर्द,आढा,पासोडी, शिंदी, वानखेडा या गावांचा समावेश आहे. नव्याने अस्तित्वात आलेल्या जवखेडा ठेंग गणामध्ये जवखेडा ठेंग आणि चिंचखेडा असे दोन गण असतील जवखेडा गणात जवखेडा ठेंग,बोरखेडी गायकी, म्हसरूळ, आसई, वरूड खुर्द पिंपळगाव कड, घाणखेडा तर चिंचखेडा गणात चिंचखेड्यासह हिवराबळी आरतखेडा, गोकुळवाडी, हरपाळा, देऊळगाव देवी, पिंपळखुटा, वरखेडा विरो, रेपाळा सावरखेडा, विरखेडा भालकी या गावांचा समावेश आहे.
वेळप्रसंगी न्यायालयात जाऊ : कळंबे
जाफराबाद तालुक्यातील गट आणि गणांची रचना करताना प्रशासनाने पूर्णपणे सत्ताधाऱ्यांच्या दबावाला बळी पडून सदर गट रचना केलेली आहे. गेल्या 30 वर्षात कधीही करण्यात आलेली नव्हती अशा पद्धतीची भौगोलिक परिस्थिती चा विचार न करता गट रचना करण्यात आली आहे. विशेषता टेंभुर्णी जिल्हा परिषद गटात गत पंचवीस वर्षात समाविष्ट नसणारी गावे राजकीय फायदा डोळ्यासमोर ठेवून समाविष्ट करण्यात आली आहेत. या सर्व गट रचनेवर सर्व पुराव्यांशी आक्षेप नोंदवणार असून प्रशासनाकडून न्याय न मिळाल्यास वेळप्रसंगी उच्च न्यायालयात दाद मागितली जाईल आणि सत्तेचा वापर करून रडीचा डाव खेळणाऱ्यांना धडा शिकवला जाईल असे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रामधन कळंबे यांनी सांगितले