तभा फ्लॅश न्यूज : निवडणूक आयोगाने आज दुपारी पत्रकार परिषद घेतली. या वेळी आयोगाने सर्व पक्षांच्या मागणीनुसार पुढील १५ दिवसांत सर्व फेरतपासणी करून अहवाल सादर केला जाणार असल्याचे सागितले.
यावेळी आयोगाने मतचोरीचे आरोप फेटाळून लावले असून, अशा आरोपांमुळे संविधानाचा अवमान होत असल्याचेही नमूद केले. आम्ही कोणालाही घाबरत नाही आणि कोणत्याही पक्षात भेदभाव केला जात नाही, असे स्पष्ट आयोगाकडून करण्यात आले.
याशिवाय, मतदारांच्या फोटोसह माहिती देणे बंधनकारक असल्याचेही निवडणूक आयोगाने जाहीर केले.