मुदखेड ता प्र
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या जिल्हा सचिव पदि माधव हामंद डोणगावकर यांची नियुक्ती करण्यात आली असून, उच्चशिक्षित युवकावर पक्ष संघटनेची जवाबदारी सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला असून कॉंग्रेसची विचारधारा जिल्ह्यातील प्रत्येक गावात पोहचविण्याचा तसेच पक्ष संघटनेच्या माध्यमातून नव्या उमेदीच्या फळिची मोट बांधण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
कॉंग्रेस कमिटी चे जिल्हा अध्यक्ष बी.आर कदम यांच्या हस्ते कॉंग्रेसचे युवा कार्यकर्ते माधव हामंद डोणगावकर यांची जिल्हा सचिव पदी निवड करुन, नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले आहे.
माधव हामंद यांनी अॉल इंडिया प्रोफेशनल्स कॉंग्रेस च्या रिसर्च व्हर्टिकल सोबत बरेच दिवस कार्य केलेले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या विविध परिक्षा दिल्या असून एक अभ्यासू तरुन म्हणून ओळख आहे. लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाची धुरा सांभाळत कॉंग्रेस ची विचारधारा, तसेच कॉंग्रेस चे राष्ट्रीय नेते राहूल गांधी यांचा जाहिरनामा तळागळात पोहचविण्यात त्यांचा मोठा सहभाग होता.
जिल्ह्यात ‘एक बुथ टेन युथ’ संकल्पना प्रत्यक गावा-गावा गावात पोहोचविण्याचा संकल्प कॉंग्रेस ने केला आहे, त्या वेळी जिल्हा अध्यक्ष बी.आर कदम जिल्हा कॉंग्रेस शहर अध्यक्ष अब्दुल सत्तार, कॉंग्रेस जिल्हा उपाध्यक्ष सुभाषराव किन्हाळकर, बाळासाहेब रावणगांवकर, महेश देशमुख, कॉंग्रेस कमिटी तालुका अध्यक्ष प्रताप देशमुख बारडकर, प्रा. संदिप कुमार देशमुख, प्रा. गंगाधर सोनकांबळे यांच्या सर आदिंची उपस्थिती.