मोहोळ – आमदार राजू खरे यांची विधानसभा तालिका अध्यक्ष म्हणुन निवड करण्यात आली आहे. मुंबई येथे सुरू असलेल्या या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांनी ही निवड केली आहे.
याच बरोबर पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांची पण निवड झाली आहे.ही घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंगळवारी केली.
याचबरोबर आमदार संजय केळकर, आमदार अमित झनक, आमदार दिलीप लांडे,आमदार योगेश सागर, आमदार सुनील प्रभू,आमदार चंद्रकांत नवघरे यांचीही निवड करण्यात आली आहे.
मोहोळ तालुक्याला हा बहुमान प्राप्त झाला आहे.या मुळे आमदार राजू खरे यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

























