छत्रपती संभाजीनगर / कन्नड:- शहरात शनिवारी (दि.८) काँग्रेसतर्फे दिवाळी स्नेहमेळावा व कार्यकर्त्यांची आढावा बैठक मोठ्या उत्साहात पार पडली.
आगामी नगर परिषद, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या बैठकीत काँग्रेसने तालुक्यातील संघटनबांधणीसाठी स्पष्ट दिशा दिली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर होते, तर प्रमुख उपस्थितीत खा. कल्याण काळे, परभणीचे माजी खासदार तुकाराम रेगें, माजी आमदार व प्रदेश सरचिटणीस नामदेव पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
या वेळी खा. कल्याण काळे यांनी एकदिलाने आणि संघटितपणे काम करण्याचे आवाहन करत सांगितले की, “कन्नड नगरपालिकेवर काँग्रेसचा ताबा निश्चित आहे.” माजी खासदार रेगें यांनी कार्यकर्त्यांना बूथ लेव्हलवर जनसंपर्क वाढवण्याचा सल्ला दिला, तर माजी आमदार नामदेव पवार यांनी संघटन बांधणीला प्राधान्य देऊन प्रत्येक विभागात कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे असे आवाहन केले.
या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य धनराज बेडवाल, महिला आघाडीच्या अध्यक्षा सुमित्रा आव्हाळे, तालुकाध्यक्ष गणेश शिंदे, शहराध्यक्ष असद खान, मुजीब मेंबर, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार फरीन अब्दुल जावेद, सुलतान भाईजी, रफिक गनी, साहेबखान पठाण, याकुब शेख, अण्णासाहेब चव्हाण, दत्तू चव्हाण, मोगल वाघ, बाबा शेख यांची उपस्थिती होती.
बैठकीत एमआयएमचे फकीर रंगरेज यांच्यासह अनेकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, ज्यामुळे स्थानिक काँग्रेस संघटनेत नवचैतन्य संचारले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब पवार यांनी केले, तर सचिन पवार यांनी आभार मानले.


















