सोलापूर – विज्ञान हा मानवी जीवनाचा पाया आहे. मानवी जीवनाचे महत्वाचे अंग आहे. या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांच्या उत्सुकता, कल्पकता आणि सृजनशीलतेला चालना मिळते असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सहायक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे यांनी व्यक्त केले.
सहकार महर्षी कै. वि. गु. शिवदारे अण्णा यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मराठी विज्ञान परिषद सोलापूर विभाग आणि कै. वि. गु. शिवदारे जन्मशताब्दी समारोह समिती यांच्या संयुक्त विद्यमाने युनिक इंग्लिश मीडियम स्कूल, सोलापूर येथे आयोजित केलेल्या दोन दिवसीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप उत्साहात पार पडला.
समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी हिराचंद नेमचंद वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत येळेगावकर हे होते, तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर येथील सहाय्यक कुलसचिव मा. डॉ. शिवाजीराव शिंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
अध्यक्षीय मनोगतात डॉ. येळेगावकर यांनी महत्त्वाचा विचार मांडला ”ज्ञान विज्ञानाला संस्कृतीची जोड असावी, संशोधन हे समाजाच्या आणि मानव जातीच्या कल्याणासाठी असावे.”
त्यांनी पुढे सांगितले की, “विद्यार्थ्यांनी जिद्द, कुतूहल, जिज्ञासेला सराव, चिकाटी आणि मेहनतीची जोड देऊन प्रगती करावी. विज्ञान-तंत्रज्ञानाचा विकास हा सजीवसृष्टीच्या कल्याणासाठी असावा.”
*प्रदर्शनातील सहभाग*
या विज्ञान प्रदर्शनामध्ये सोलापूर शहरातील पाच गटातून ४० शाळा-महाविद्यालयांमधून १३७ उपकरणे आणि ३०० विद्यार्थी सहभागी झाले होते.
*गुणवंतांचा सत्कार*
युनिक इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता सातवीत शिकणाऱ्या बाबासो उस्मान मुजावर या विद्यार्थ्यांची राज्यस्तरावरील ‘टीम महादेव’ या फुटबॉल टीममध्ये कर्णधार (कॅप्टन) म्हणून निवड झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते त्याचा विशेष सत्कार करण्यात आला.
प्रदर्शनाचे प्रास्ताविक द.सो.ता.शि. मंडळाचे विश्वस्त श्री भीमाशंकर शेटे यांनी केले. डॉ. सतीश कुलकर्णी, सौ. गोपिका, श्री. ऋषिकेश बदामीकर, श्री. सिद्धराम पुजारी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
*मान्यवरांची उपस्थिती*
याप्रसंगी व्यासपीठावर द.सो.ता.शि. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री. राजशेखरजी शिवदारे, शैक्षणिक सल्लागार सौ. अंजली तिवारी, मुख्याध्यापिका सौ. पूजा बाजपेयी, मराठी विज्ञान परिषद सोलापूरचे अध्यक्ष प्रा. व्यंकटेश गंभीर यांची उपस्थिती होती. मराठी विज्ञान परिषद सोलापूर विभागाचे कार्यवाह श्री. क्रांतीवीर महेंद्रकर आणि श्रीमती प्रियांका आराध्ये उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी गायत्री जांबगी हिने केले, तर आभार प्रदर्शन कुमारी शुभ्रा चव्हाण हिने केले.
*पारितोषक विजेते विद्यार्थी*
विज्ञान प्रदर्शनातील विविध गटांमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांची यादी खालीलप्रमाणे आहे:
गट क्रमांक विद्यार्थ्याचे/विद्यार्थ्यांचे नाव प्रकल्पाचे नाव शाळा/महाविद्यालय
गट A (५वी ते ७वी) १ आदिती अडकुल ब्रह्मोस युनिक इंग्लिश मीडियम स्कूल
२ गोवर्धन डागा ऑटोमॅटिक फायर विदाऊट ड्रायव्हर एस आर चंडक हायस्कूल
३ अपेक्षा व दीपिका ऑटोमॅटिक वॉटर मॅनेजमेंट सिद्धेश्वर बालक मंदिर
गट B (८वी ते १०वी) १ वीर फडतरे व श्रीपाद कुंभारीकर ऍडजेस्टेबल स्टिक अँड चेअर मॉडेल भारती विद्यापीठ
२ चंदन कमलापुरे व ओंकार रंगापुरे रोबोट डी. के. असावा हायस्कूल
३ श्रेया अधटराव गॅलिलिओ टेलिस्कोप के.एल.इ. इंग्लिश मीडियम स्कूल
गट C (ज्युनियर कॉलेज) १ रोहन पांगडीवाले, पल्लवी गोलापल्ली, राजनंदिनी जामखेड इलेक्ट्रिसिटी फ्रॉम वेस्ट वालचंद ज्युनिअर कॉलेज
२ झोया शेख व इकरा डोका ब्रेन कॉम्प्युटर इंटरफेस एम. ए. पानगल ज्युनियर कॉलेज
३ ईशा गुजरे व अनुष्का बंडाळे सोलार एनेबल पोल्युशन फ्री एअर कंडिशनर सेवासदन ज्युनिअर कॉलेज
गट D (इंजिनिअरिंग कॉलेज) १ टीम अश्वमेध- सौरभ अनुरे फॉर्म्युला कार एन. के .ऑर्किड इंजिनिअरिंग कॉलेज
२ मंथन गोडाळे इ-बायसिकल एन. के. ऑर्किड इंजिनिअरिंग कॉलेज
३ वैभव पाटील आणि मोनिका दोंता इम्प्लिमेंटेशन ऑफ स्मार्ट एग्रीकल्चर फोर कल्टिवेशन इन हिली रीजन डब्ल्यू. आय .टी .
गट E (खुला गट) १ कुमारी प्रगती मिस्कीन सेवासदन ज्युनिअर कॉलेज
२ श्री प्रमोद कुलकर्णी ज.रा. चंडक प्रशाला
३ श्री नूर अहमद कारंजे यशोधरा प्रशाला
याशिवाय सर्वोत्कृष्ट नवकल्पना म्हणून “कबुतरे हटवा -पण प्रेमाने “या बिटला प्रशालेच्या समर्थ इंदापुरे व असलम मुजावर या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रकल्पाला गौरवण्यात आले. तसेच आहेरवाडी येथील दिनेश भिमण्णा वाघमारे या विद्यार्थ्याने शेतीची पाच कामे एकत्र करणारे यंत्र तयार केले आहे त्याचे प्रात्यक्षिक सादर केले त्यासाठी त्याचाही गौरव याप्रसंगी केला .
“गुरुराज ड्रोन सर्विसेस ,बेलाटी” येथील श्री माणिक प्रभू सुतार यांनी गेले दोन दिवस” पिकांवर ड्रोन च्या साह्याने फवारणी “याचे प्रात्यक्षिक विनामूल्य दाखवले त्यांचाही गौरव याप्रसंगी करण्यात आला.
या दोन्ही दिवसासाठी संपूर्ण मंडप व्यवस्था श्री एस. एम. पाटील यांच्या वतीने विनामूल्य करण्यात आली होती.

















