Sunday, February 8, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पैनगंगेच्या तीरावरील अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता…

तरुण भारतbyतरुण भारत
February 5, 2026
in marathwada
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

माहूर – तालुक्यातील टाकळी गावच्या चोलेवाडी येथे लगतच्या पैनगंगेच्या तीरावरती गेल्या बारा वर्षापासून सतत सुरू असलेल्या हरीनाम सप्ताहाची सांगता
कलियुगामाजी करावें कीर्तन ।
तेणें नारायण देईल भेटी ॥
या सद्भावनेने ह. भ. प. शिवा महाराज यांच्या कल्याच्या कीर्तनाने करण्यात आली.

हरी नामाचा गजर हरिनामाचा काठी डाव मांडिला, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल’ अशा विठूरायाच्या गजरात चोले वाडी टाकळी गावात हनुमान मंदिरा पासून दिंडी काडून हरीनाम सप्ताह सोहळ्यानिमित्ताने हरिनामाचा गजर करण्यात आला गावात घरो घरी रांगोळी सडा टाकून दिंडीचे स्वागत केले सात दिवसात सुरु असलेल्या पारायण, भागवत, हरिपाठ, भारूड, महाप्रसाद आणि रात्रीला कीर्तनाचा कार्यक्रम तसेच धार्मिक कार्यक्रमांमुळे पैंणगंगे काठावर जणू पंढरपुरासारखे वातावरण पाहायला मिळाले.या सोहळ्यात अनेक दानशूर व्यक्तीं यांच्या कडून महाप्रसाद देऊन विशेष सहकार्य केले तसेच या कीर्तन सोहळ्यात पारायण ह. भ. प.विलास महाराज टाकळीकर आणि भागवत ह. भ. प. शिवा बापू महाराज यांच्या मधुर वाणीतून भागवत कथा पार पडली. या अखंड हरिनाम सप्ताह विशेष म्हणजे चिमुकल्याने हरिपाठ करून उपस्थिताची मनं जिंकली.
यावेळी कीर्तन सोहळ्यात उपदेश करताना भावी पिढीतला माणूस घडवण्यासाठी अशा सोहळ्याचे आयोजन करणे काळाची गरज असल्याची भावना ह. भ.प. निवृत्ती महाराज चाटे यांनी आपल्या कीर्तनातून व्यक्त केली.

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. म्हणून या भूमीला खर्‍या अर्थाने संत परंपरेच अनुष्ठान लाभलं आहे. संत परंपरेमुळे महाराष्ट्राला मोठा वारसा लाभला आहे. याच माध्यमातून हा वारकरी संप्रदाय खर्‍या अर्थाने संपूर्ण जगभरात पोहोचायला मदत झाली. संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत गोरा कुंभार, संत चोखामेळा, संत जनाबाई, संत तुकाराम, संत नामदेव, संत निवृत्तीनाथ, संत मुक्ताबाई, संत सावता माळी, संत सोपानदेव यांच्यासोबतच अनेक संतांनी आपल्या अभंगातून, निरुपणातून समाजाला एक सकारात्मक दिशा देण्याच काम केलं.
ज्ञानदेवें रचिला पाया । उभारीलें देवालया॥
नामा तयाचा किंकर । त्यानें केला हा विस्तार ॥
जनार्दन एकनाथ । खांब दिला भागवत॥
तुका झालासे कळस। भजन करा सावकाश॥
संत बहिणाबाई आपल्या या अभंगात वारकरी संप्रदायाची मुहूर्तमेढ कशा पद्धतीने रोवली गेली याची माहिती देतात. बाराव्या शतकात संत ज्ञानेश्वरांनी या भूमीत वारकरी संप्रदायाचा पाया रचला. आणि तुकोबारायांनी त्यावर कळस चढवायच काम केलं.
नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग। जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग॥
पहिले कीर्तनकार म्हणून संत नामदेव महाराज यांनी या परंपरेला सुरुवात केली. यावेळी ज्ञानोबाराय टाळकरी म्हणून तर गोरोबा काका पखवाज वाजवून नामदेवरायांना साथ द्यायचे. यावेळी चंद्रभागेच्या वाळवंटात ही कीर्तनं पार पडायची. इथूनच खर्‍या अर्थाने वारकरी कीर्तन परंपरेला प्रारंभ झाला आणि ही परंपरा आजतागायत सुरू आहे.
कालांतराने सात दिवसाचे पारायण सामूहिकरित्या सर्वांनी एकत्र येऊन पार पडू लागले. यातूनच सात दिवसाचा ‘अखंड हरिनाम सप्ताह’ खर्‍या अर्थाने सुरू झाला. सप्ताह म्हणजे वारकरी संप्रदायाची उपासना आहे. या सात दिवसात संतांचे अखंड नामचिंतन करण्यात येते.
अवघे होती लाभ एका या चिंतने ।
नामसंकीर्तनें गोविंदाच्या ॥

पहाटे काकडा आरती. त्यानंतर ज्ञानेश्वरी किंवा गाथ्याचे सामुदायिक पारायण. दुपारी प्रवचन. संध्याकाळी हरिपाठ आणि रात्री हरिजागरण म्हणजेच कीर्तन, असा साधारण हरिनाम सप्ताहाचा दिनक्रम.
महाराष्ट्रात शेकडो वर्षांची परंपरा असलेले अखंड हरिनाम सप्ताह आजतागायत चालू आहेत. हिच परंपरा माहूर तालुक्यातील टाकळी गावच्या चोलेवाडी येथे गेल्या बारा वर्षांपासून सतत लगतच्या पैनगंगेच्या तीरावरती अखंडपणे सुरू आहे.

याठिकाणी सुरू असलेल्या सप्ताहात आघाताप्रमाणे पहिल्या दिवसाचे कीर्तन हे नामपर म्हणजे नाम महात्म्य सांगून देवाच्या स्वरुपाच वर्णन करणारं. दुसर्‍या आणि तिसर्‍या दिवशी संत महात्म्य म्हणजेच संतांच चरित्र सांगितलं गेलं. चौथ्या आणि पाचव्या दिवशी भक्तीपर. सहाव्या दिवशी वेदांताचे अभंग यावर तर सातव्या दिवसाचे मागणीपर आणि आठव्या म्हणजेच शेवटच्या दिवशी काल्याचे कीर्तन केले गेले.

टाकळीच्या चोलेवाडी येथील पैनगंगेच्या तीरावरती आयोजित हरिनाम सप्ताहात गावातील सर्वच ग्रामस्थ, विविध संस्थांच्या वतीने सप्ताहाचा नियोजन करण्यात आले. आजूबाजूच्या गावातील लोकांना देखील यावेळी सप्ताहाच आमंत्रण दिलं गेलं. यातून गाव परिसरातील सर्व टाळकरी, माळकरी, भाविक, भजनी मंडळ यांनी एकत्र येऊन हा सप्ताह साजरा केला.रोजच्या कीर्तनाला टाळकरी, पखवाज वादक, पेटी वादक, गायक, विनाधारी असे सर्वजण पांढर्‍या शुभ्र कपड्यात हजर होते. डोक्यावर टोपी, खांद्यावर उपरणे, गळ्यात टाळ, कपाळावर बुक्का असा एकंदरीत पेहराव होता.
विनाधारी महाराजांकडे विना देण्यात आली आणि एकमेकांच्या पाया पडत ‘राम कृष्ण हरी’ भजनाने रात्रीच्या कीर्तनाला सुरुवात केली गेली.यावेळी

रुप पाहतां लोचनीं ।
सुख जालें वो साजणी ॥
तो हा विठ्ठल बरवा ।
तो हा माधव बरवा ॥
बहुतां सुकृतांची जोडी ।
म्हणुनि विठ्ठलीं आवडी ॥
सर्व सुखाचें आगर ।
बाप रखुमादेवीवरू ॥
हा अभंग झाल्यावर विठोबा रखुमाई भजन सुरुवात तर शेवटी ‘जय विठ्ठल जय हरी विठ्ठल’ भजन होऊन कीर्तनाची सांगता होत होती.

अशा पद्धतीने सात दिवसाच्या सप्ताहात विविध महाराजांची कीर्तन झालीत. सप्ताहाचा शेवट काल्याच्या कीर्तनाने झाला. श्रीकृष्णाच्या जीवनातील महत्वाच्या प्रसंगांची माहिती यावेळी सांगितली गेली. यावेळी साधारण शेवटच्याच दिवसाचे कीर्तनकारांनी मुक्कामी थांबून दुसर्‍या दिवशी सकाळी काल्याचे कीर्तन केले. हे कीर्तन सकाळी साधारण दहाला सुरू झाले.

या कीर्तनात कृष्णाच्या विविध लीला सांगणार्‍या गौळणी म्हटल्या गेल्या. शेवटी दह्याच्या प्रसादाचं मडकं फोडून काला साजरा केला गेला. दुपारी सर्व ग्रामस्थांसाठी महाप्रसाद दिला गेला. यावेळी सप्ताहासाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं अशा मंडळींचे आयोजकांच्या वतीने आभार मानून सप्ताहाची सांगता करण्यात आली.

Post Views: 16
Previous Post

नांदेड ते निजामबाद दरम्यान पुष पुल रेल्वे सेवा सुरू करा – मराठी पत्रकार संघाची मागणी

Next Post

मारोती मानेमोड स्व. सतीश दराडे राज्यस्तरीय पुरस्कारांचे मानकरी ठरले

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

मारोती मानेमोड स्व. सतीश दराडे राज्यस्तरीय पुरस्कारांचे मानकरी ठरले

ताज्या बातम्या

20 हजार लाडू अन रक्तदान शिबीरासह साजरा झाला प्रकट दिन#public #marathinews #solapurnews #viral #viral

February 8, 2026

मोहोळजवळील एका ढाब्यावर रात्री ११ वाजता दोन ईव्हीएम मशीन आढळून आल्याची घटना समोर आली आहे.#public

February 8, 2026

२० हजारबलाडू वाटप अन रक्तदान शिबिरासह साजरा झाला प्रकट दिन..#public #marathinews #solapurnews #viral

February 8, 2026

आमच्या कार्यकर्त्याला मारहाण केली खा. मोहिते पाटलांचा आरोप.#marathinews #public #viral #aajsolapur

February 8, 2026

प्रिसिजन संगीत महोत्सव सतार स्वराची सजली मैफिल.#public #marathinews #solapurnews #viral #aajsolapur

February 8, 2026

बसवण्णाच्या चबुतरासह पुतळ्याचेही दुरुस्ती काम सुरू#public #marathinews #solapurnews #mh13 #viral

February 8, 2026

शासकीय चित्रकला ग्रेड स्पर्धेत युनिक इंग्लिश मीडियम स्कूलचे घवघवित यश

February 8, 2026

माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त पुस्तके वाटप

February 8, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0665563

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697