वेळापूर -वेळापूर येथे इंग्लिश स्कूल वेळापूर प्रशालेतील १७ वर्ष मुले व १९ वर्ष मुली, १९ वर्ष मुले खोखो संघातील सर्व खेळाडूंचा सन्मान करण्यात आला .
या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य रमेश पवार होते. तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे स्कूल कमिटी चेअरमन प्रतापराव पाटील , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिलीपराव जगदाळे, शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा सौ .प्रियंका पोरे, उप मुख्याध्यापक पठाण शिवशरण, पर्यवेक्षक बापूसाहेब सावळे, उपस्थित होते.
यावेळी सतिश कदम, यांना पुरस्कार मिळाल्याबद्बल तसेच शिवाजी जाधव यांचा सुयश मिळवलेले खो खो खेळाडू यांचा सन्मान करण्यात आला.
सतीश कदम यांनी सत्काराला उत्तर देताना म्हणाले की, खेळाडूने मनापासून कष्ट केले तर तो जिददीच्या जोरावर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीयस्तरावर पोहचू शकतो, ज्यामुळे आपल्या गावाचे, शाळेचे नाव देशाच्या कानाकोपर्यात नेऊ शकतो . राष्ट्रीय स्तरापर्यंत खेळाडू गेला तर त्याला दहावी, बारावी मध्ये २० गुण मिळवू शकतो . नोकरीसाठी ५ टक्के आरक्षणासाठी पात्र होऊ शकतो असे सांगीतले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ. रामगडे मॅडम व श्रीमती रुपाली बाबर यांनी केले तर आभार नामदेव बावचे यांनी केले .

















