जाफराबाद:- जागर प्रतिष्ठान ही संघटना गेल्या अनेक वर्ष पासून महाराष्ट्र मध्ये गड किल्ले संवर्धन आणि विविध सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक जायतो निभवण्याचा प्रयत्न करणारी एक अग्रगण्य सामाजिक संस्था आहे दुर्ग संवर्धन या विषयावर घटना कायमच आघाडीवर राहून कार्यरत आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात संघटनेचे विस्तार झालेला आहे.
संघटनेच्या माध्यमातून अनेक ठिकाणी अनेक किल्ल्यांवर दुर्ग संवर्धन मोहिमा वारंवार राबवले जातात परंतु यासाठी शासन स्तरावर ही प्रयत्न झाले पाहिजे म्हणून संघटना प्रयत्नशील आहे तसेच आपल्या महाराष्ट्राची भूमि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने आणि शौर्याने पावन झालेले भूमी आहे याच मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास घडवला स्वराज्य स्थापन केले अनेक मावळ्यांनी बलिदान दिले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी शौर्य गाजवले ते इतिहासाची साक्ष देणारे गड किल्ले स्वराज्यासाठी झुंज देणाऱ्या मावळ्यांच्या समाध्या आणि ऐतिहासिक लढाई यांची साक्ष देणारे ऐतिहासिक ठिकाण या सर्वांच्या संवर्धनासाठी राज्य सरकारने स्वतंत्र गडकोट विकास महामंडळ स्थापन करावे.
या मागणीसाठी जागर प्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष किसन पाटील चव्हाण हे गेल्या अनेक वर्षापासून लढा देत आहेत नुकतीच त्यांनी राज्यव्यापी आंदोलनाला साथ घातलेली आहे त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जागर प्रतिष्ठानच्या जालना जिल्हा कार्यकारणीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे जिल्हाधिकारी यांना जागर प्रतिष्ठान चे अध्यक्ष किसन पाटील चव्हाण यांच्या सूचनेवरून निवेदन देण्यात आले.
यावेळी जागर प्रतिष्ठानचे विठ्ठल राजे खडके, माऊली नंदेवर,अभिषेक उफाड,आदी .उपस्थित होते




















