सोयगाव / संभाजीनगर – प्रशालेचे मुख्याध्यापक दादाराव राठोड व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष,उपाध्यक्ष,सचिव व सर्व शिक्षकवृंद जिल्हा परिषद प्रशाला सोयगाव यांनी सर्व माजी विद्यार्थी जिल्हा परीषद प्रशाला सोयगाव यांना नम्र आवाहन करून प्रशालेच्या सर्व माजी विद्यार्थी व विद्यार्थीनी यांची स्नेह मेळावा बैठक दि.१८ मंगळवर रोजी सकाळी १०: वाजता स्थळ जिल्हा परिषद प्रशाला सोयगाव येथे शासन निर्णयानुसार आयोजित करण्यात आलेला असून सर्वानी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले होते .
त्यानुसार मंगळवार रोजी जिल्हा परिषद प्रशाला सोयगाव येथे प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह बैठक मेळावा होऊन त्यात जिल्हा परिषद प्रशाला सोयगाव येथे माजी विद्यार्थ्यांची संघ स्थापन करण्यात आला .
या कार्यक्रमाला प्रशालेचे विविध क्षेत्रात सामाजिक, राजकीय,शैक्षणिक,व्यावसायिक,उद्योग,शेती,सहकार, तंत्रशिक्षण,उच्च शिक्षण, वैद्यकीय, संशोधन, प्रशासन,कला इत्यादी अशा विविध क्षेत्रात कार्यरत असलेले माजी विद्यार्थी उपस्थित होते.यावेळी प्रशालेच्या माजी विद्यार्थी संघ कार्यकारणी समिती निवडण्यात आली .
तालुक्यातील प्रसिद्ध व्यावसायिक तुकाराम तायडे यांची अध्यक्ष तर निवृत्त गटशिक्षणाधिकारी गिरीश जगताप कार्याध्यक्ष,प्राध्यापक निलेश गाडेकर,कोषाध्यक्ष युवानेतृत्व हर्षल काळे, सहकार्याध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या सह सर्व सदस्य रवींद्र काळे,संजय शहापूरकर,दिलीप रावणे,महेश फुसे, गजानन ढगे,कृष्णा जुनघरे,निलेश मिसाळ, मोहन इंगळे, मंगलाताई बोरसे,दौलतसिंग परदेशी, सदस्य सचिव मुख्याध्यापक दादाराव राठोड याप्रमाणे माजी विद्यार्थी संघ कार्यकारी समिती एक मताने चर्चेतून निवडण्यात आली.
सदरील स्नेह मेळावा बैठकीच्या अध्यक्षस्थानी समाजसेवक व शिक्षणप्रेमी संजय शहापूरकर हे होते.प्रमुख पाहुणे म्हणून प्रभारी शिक्षण विस्तार अधिकारी सचिन पाटील,सोयगाव केंद्राचे केंद्रप्रमुख फिरोज तडवी, निवृत्त गटशिक्षणाधिकारी पाचोरा तथा प्रशालेचे माजी विद्यार्थी,शिक्षक मुख्याध्यापक गिरीष जगताप हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीप प्रज्वलनाने झाली.यावेळी मुख्याध्यापक यांच्या वतीने प्रशालेचे माध्यमिक शिक्षक दौलतसिंग परदेशी यांनी शासनाचा माजी विद्यार्थी संघ स्थापनेबाबत मार्गदर्शक असा शासन निर्णय वाचून दाखवून माजी विद्यार्थी संघाचे कार्य व जबाबदारी कर्तव्य,आवश्यकता याबाबत प्रास्ताविकात मार्गदर्शन केले यानंतर उपस्थितांमधून वरील कार्यकारणीची निवड करण्यात आली.तर सर्व माजी विद्यार्थी हे संघाचे सदस्य असतील असे जाहीर करण्यात आले .
यावेळी प्रशालेचे माजी विद्यार्थी निलेश गाडेकर यांनी प्रशालेतील विविध उपक्रमात खास करून क्रीडा क्षेत्रात प्रशालेच्या विद्यार्थ्यांना विना मोबदला व कुठलीही क्रीडा क्षेत्रातील स्पर्धेबाबत मार्गदर्शन करण्याचे मान्य केले.गिरीश जगताप यांनी सखोल मार्गदर्शन करून प्रशालेच्या भौतिक गरजासाठी प्रशालेच्या अनेक माजी विद्यार्थी यांच्याशी संपर्क साधून गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सदरील कार्यकारी समितीने कार्य करावे व आपल्या प्रशालेचा गुणवत्ता पूर्ण विकास साधावा असे आवाहन केले.सचिन पाटील व फिरोज तडवी यांची समायोचीत मार्गदर्शन पण मनोगत व्यक्त केले प्रशालेचे माजी विद्यार्थी व प्राध्यापक अनिल मानकर यांनी प्रशालेच्या ज्या काही भौतिक गरजा असतील याची विकासात्मक सखोल आराखडा करून सदरील समिती व शाळा व्यवस्थापन समिती व प्रशासन यांनी शाळा विकास आराखड्यानुसार प्रशालेची उन्नती घडवण्यासाठी कार्य करावे असे मत व्यक्त करून प्रशालेला कोणतीही गरज असेल तेव्हा आवाहन कराल तेव्हा मदत देण्याचे कबूल केले.नूतन अध्यक्ष तुकाराम तायडे व सर्व कार्यकारिणी सदस्यांनी प्रशालेच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी प्रशालेच्या सर्व माजी विद्यार्थ्यांना संपर्क करून प्रशालेचा गुणवत्तापूर्ण विकासासाठी प्रयत्न करण्यात येतील असे निवेदन केले.
यावेळी प्रशालेच्या विकासासाठी वेळोवेळी माजी विद्यार्थी म्हणून भरीव मदत करण्याचे सर्वच उपस्थित माजी विद्यार्थी यांनी मान्य केले.माजी विद्यार्थी बाळु बोरसे यांनी प्रशालेच्या विद्यार्थी गुणवता विकास उपक्रमासाठी साठी रोख ११११ रु ची त्वरित आर्थिक मदत केली. दौलतसिंग परदेशी यांनी 5000 रूपची आर्थिक मदत घोषित केली.शाळेच्या नवीन इमारतीचे बांधकाम करण्यात येत आहे.इमारत पुर्ण झाल्यानंतर नेमकी शाळेला कोणती भौतिक बाबीची आवश्यकता आहे ते पाहुन सर्व जण आर्थिक किंवा वस्तुस्वरूपात मदत करुया असे सर्वानुमते ठरले .
वरील कार्यकारणीसह यावेळी प्रशालेचे माजी विद्यार्थी समाजसेवक राजू दुतोंडे,नगरसेवक संतोष बोडखे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामेश्वर शिरसाट,प्राध्यापक डॉ. योगेश पुरी,शिक्षक पंकज रगडे,गोपाल चौधरी,विशाल चौधरी,योगेश फूसे,सुपडू सोनवणे यांचे सह कृषी भूषण शेतकरी अरुण सोहनी,सचिन चौधरी,ऋषिकेश लवटे,संजय ताडे,दिलीप कळवत्रे,अशोक घनगाव,बाळू बोरसे,समाधान काळे,अनिल मानकर यांचे समाजातील अनेक माजी विद्यार्थी बैठकीस उपस्थित होते.यावेळी प्रशालेचे वतीने अध्यक्ष व नूतन कार्यकारणी समितीचा स्वागतपर सन्मान करण्यात येऊन पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रशालेचे मुख्याध्यापक दादाराव राठोड यांच्या नेतृत्वात सर्व शिक्षक सुखदेव पाटील, दौलतसिंग परदेशी,शिवाजी नवले,राजेंद्र उंबरकर,विद्याधर बागुल,संतोष भारद्वाज,संगीता सोनवणे,वैजनाथ सावळे, तुकाराम पायघन,जय वाघ निर्देशक,सचिन ढगे,
सीमा राऊत,शिवराम आगे यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भास्कर चौधरी तर आभार प्रदर्शन श्री अनिल मानकर यांनी व्यक्त केले.
सोबत फोटो –


















