जगातील दिग्गज इन्वेस्टरमेन्ट गुरु वॉरेन बफे यांनी इक्विटी मार्केटमधील त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाच्या आधारावर मंदी टाळण्यासाठी गुंतवणुकीच्या अनेक टिप्स दिल्या आहेत. तुम्हाला देखील शेअर बाजारातील गुंतवणुकीतून नफा कमावण्यासाठी आणि नुकसान टाळायचा
शेअर बाजारातील गुंतवणूक अनिश्चित असते. म्हणजे एक दिवस मार्केट वधारतो तर दुसऱ्याच दिवशी कोसळतो. गेल्या वर्षी रशिया-युक्रेन युद्धापासून जगभरातील शेअर बाजारात वाढलेली असनिश्चितता इस्रायल आणि हमास यांच्या युद्धामुळे आणखी गडद झाली आहे. तुम्हपण शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर या अस्थिरतेच्या काळात नुकसान टाळण्यासाठी आणि नफा मिळवण्यासाठी काही उपाय करावे लागतील. जगभरात इन्वेस्टमेंट गुरु म्हणून ओळख असणारे वॉरन बफे यांचे मंत्र नक्कीच तुमच्या उपयोगाला येऊ शकतात.
बेर्कशायर हॅथवेचे अध्यक्ष आणि सीईओ वॉरेन बफे यांना शेअर बाजारात इंवेस्टटमेंट गुरु म्हणून ओळखले जाते. बाजारातून पैसा कमावण्यासाठी आणि तोटा टाळण्यासाठी त्यांनी वेळावेळी लोकांचे सल्ले दिले आहेत जे तुम्ही पाळल्यास तुमचे नुकसान होणार नाही आणि स्टॉक मार्केटमधून कमाई करूनच बाहेर पडाल.
शेअर बाजारात एक म्हण आहे- इथे शेअर्सची खरेदी-विक्री करून नाही तर वाट पाहून पैसे बनतात. वॉरेन बफे यांनाही तसचं वाटत. दीर्घकालीन गुंतवणुकीवर लक्ष देऊन अल्पकालीन गुंतवणूक टाळावी असं बफे म्हणतात. शेअर बाजार काळासोबत वाढतो, ज्याचा फायदा गुंतवणूकदारांना मिळतो, असं बफे म्हणतात.
जे गुंतवणूकदार शेअर बाजारातील अस्थिरतेवर जास्त प्रतिक्रिया देतात त्यांचे नुकसान होते असं वॉरेन बफे मानतात. चढउताराचा बाजारात गुंतवणूकदार घाबरतात आणि घाईघाईत निर्णय घेतात, पण त्यांनी असं करू नये. बाजाराच्या तेजी-मंदीला घाबरू नका आणि दीर्घकालीन टार्गेटवर लक्ष्य केंद्रित करा जेणेकरून तुमचे नुकसान होणार नाही.
ज्या कंपनीची पायाभूत रचना मजबूत असते त्या कंपन्यांमध्ये लावलेले पैसे कधीही बुडत नाही, असं बफे म्हणतात. म्हणून, मजबूत फंडामेंटल असलेल्या कंपन्या शोधा आणि दीर्घकालीन गुंतवणूक करा. मजबूत फंडामेंटल्स असलेल्या कंपन्या म्हणजे ज्यांचे ताळेबंद (बॅलन्सशीट) चांगले आहेत, कमाई स्थिर आणि ज्यांचे व्यवस्थापन सक्षम लोकांच्या हातात आहे.
एकाच ठिकाणी गुंतवणूक केलेल्यांचं नुकसान होतं असं बफे म्हणतात. म्हणून तुमचे सर्व भांडवल एकाच ठिकाणी गुंतवू नका. वेगवेगळ्या मालमत्ता वर्गांमध्ये गुंतवणूक करून तुम्ही जोखीम कमी करू शकता. कोणत्याही एका मालमत्ता वर्गात गुंतवणूक केल्यास परताव्याची हमी मिळत नाही तसेच धोकाही वाढतो.
वॉरेन बफे रिअल इस्टेट, वस्तू किंवा सेवांचे उत्पादन करणारे व्यवसाय आणि शेतजमीन यासारख्या उत्पादक मालमत्तांमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात जे रोख प्रवाह निर्माण करतात. उत्पादक मालमत्तेमध्ये गुंतवणूक केल्याने स्थिर उत्पन्न आणि विश्वासार्ह स्त्रोत निर्माण होतो जे बाजाराच्या कामगिरीवर अवलंबून नसते.