ईस्लापुर / नांदेड – पर्मांनंड शिक्षक आमच्या शाळेला द्या या मागणीसाठी मागे २६ नोव्हेंबर रोजी ईस्लापूर सावरकरनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतीला पालकांनी कुलूप ठोकले होते त्या अनुषंगाने सतत दोन दिवसाच्या नंतर येथील गटशिक्षणाधिकारी अनिल महामुने ‘ यांनी दोन शिक्षकाची मे महिन्यापर्यंत नेमणूक केल्याचे पत्र दिल्याने अखेर येथील बंद शाळेचे कुलूप खोलण्यात आले त्यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक सरपंच माजी सरपंच व पालक वर्ग उपस्थित होते .
किनवट तालुक्यातील ईस्लापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गेल्या महिन्याभरापासून डेप्युटेशन च्या नावावर अध्यापनासाठी येथील शाळेवर रोज नवीन शिक्षक येत असल्याने येथील पालकांनी विद्यार्थ्यांचे कोणतेच बेसिक शिक्षण पूर्ण न होत नसल्याने अनेक वेळा संबंधित शिक्षण विभागाकडे कायमस्वरूपी शिक्षकाची मागणी केली होती परंतु त्या मागणी ची दखल न घेतल्याने दिनांक २६ रोजी सदरील शाळेतील पालकानी शाळेला कुलूप ठोकले होते . त्या संदर्भात अखेर त्या शाळेला मे महीण्यापर्यंत राजेंद्र देवकते , व धनंजय शिंदे , असे दोन शिक्षक मिळाले ,



















