तभा वृत्तसेवा येरमाळा – धाराशिव तालुक्यातील येडशी येथील जनता विद्यालयामधील माजी विद्यार्थ्यांनी वृक्षारोपन करून सामाजिक स्तुत्य उपक्रम केला आहे .
सन १९९३/ ९४ साली जनता विद्यालय येडशी येथे दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यानी वॉट्सॲप ग्रुप तयार करून त्याचा उपयोग विचारांची देवाणघेवाण करून त्यातून समाजपयोगी उपक्रम राबविण्यासाठी केला . येडशी ते रामलिंग मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा जवळ पास शंभर ते दिडशे वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन करण्याचे काम या माजी विद्यार्थ्यांनी हाती घेतले आहे .
दिनांक ७ रोजी सकाळी वृक्षारोपण करण्यात आले त्यामध्ये जांभुळ, चिंच, वड, पिंपळ यासारख्या फळांच्या झाडाचा समावेश आहे . या सामाजिक उपक्रमाबरोबरच गरजु लोकांना लग्नात आम्ही आर्थिक सहकार्य करतोत असे ग्रुपमधील आनंद भंडारी, जमीर पटेल , रामदास जगताप यांनी सांगितले
. हे वृक्षारोपण करण्यासाठी पांडुरंग म्हेत्रे, सूरज तौर, मंगेश पवार, धीरज नागटिळक, वैभव जाधव, प्रवीण देशमुख, आनंद भंडारी, समाधान कुलकर्णी, शिवराज कचरे, मयूर पवार, अनंता नागटिळक, संतोष पवार, वेदांत नलावडे यांनी परिश्रम घेतले . वॉट्सॲप ग्रुपचा उपयोग सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी केल्यामुळे येडशी परिसरातुन या माजी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात येत आहे .