पंढरपूर – जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेमध्ये येथील एमआयटी विश्वशांती गुरुकुल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अभूतपूर्व कामगिरी करत यश संपादन केले आहे.
क्रीडा विभागातर्फे आयोजित विविध वयोगटातील शालेय स्केटिंग स्पर्धांमध्ये १४ वर्षाखालील मुलींच्या गटात पाही कोडलकर हिने प्रथम, जोया जमादार द्वितीय तर ज्ञानेश्वरी वनवे हिने तृतीय क्रमांक पटकावला. १७ वर्षाखालील गटात स्वस्ती माळवदकर द्वितीय तर काव्यांजली इंगवले हिने चौथा क्रमांक मिळवला. १९ वर्षाखालील गटात श्रावणी पावडे प्रथम आणि स्वरा चव्हाण हिने तृतीय क्रमांक पटकावला. ११ वर्षाय मुलांच्या गटात रुद्र जाधव याने प्रथम, १४ वर्षीय मध्ये मुस्तफा जमादार तृतीय तर १४ वर्षीय गटात सत्यम डोंगरे याने प्रथम क्रमांक पटकावला.
या सर्व विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. स्केटिंग स्पर्धेसाठी आवश्यक एकाग्रता आणि शारीरिक समतोल याबाबत क्रीडा शिक्षिक कविता कटारिया, साहिल राणा व पल्लवी पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी गवळी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले तसेच आणि आगामी विभागीय स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
 
	    	 
                                


















 
                