Saturday, February 14, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

तीर्थक्षेत्र अक्कलकोट नगरीच्या विकासाच्या नव्या कारभाऱ्यांकडून अपेक्षा वाढल्या !

तरुण भारतbyतरुण भारत
January 21, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अक्कलकोट –  नगराध्यक्ष पदाची सूत्रे भारतीय जनता पार्टीचे युवा नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांनी स्वीकारली आहेत. तसेच उपनगराध्यक्ष पदी ऋतुराज राठोड यांची निवड करण्यात आली. अरुंद रस्ते वाढते  भाविक तीर्थ क्षेत्रअक्कलकोट नगरीच्या विकासाचे नव्या कारभाऱ्यांसमोर आव्हान आहे  अक्कलकोटकरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. 

अक्कलकोट नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत थेट नगराध्यक्ष पदासह २२ सदस्य भारतीय जनता पार्टीचे निवडून आले आहेत. थेट नगराध्यक्ष म्हणून युवा नेते मिलन कल्याणशेट्टी हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. नूतन नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांनी दिनांक १२ जानेवारी रोजी पदभार स्वीकारला. तसेच उपनगराध्यक्षपदी युवा नेते ऋतुराज उर्फ बंटी राठोड यांची निवड करण्यात आली. अक्कलकोट नगर परिषदेच्या निवडणुकीत मतदारानी भाजपाला बहुमताने सत्ता दिली आहे. अक्कलकोटकरांच्या नव्या कारभाऱ्यांकडून विकासाच्या अपेक्षा वाढल्या असून अक्कलकोट शहराच्या विकासाचे  नव्या कारभाऱ्यांसमोर आव्हान असणार आहे. अक्कलकोट शहराचा पाणी प्रश्न , स्वच्छता , रस्त्यांची दुरावस्था , मूलभूत सुविधांचा उडालेला बोजवारा , तीर्थक्षेत्र आराखडा विकास , मंदिर परिसर व समाधी मठ परिसराचा विकास , शहरातील रस्ते रुंदीकरण ,परगावच्या भाविकांना सुविधा पुरविणे अशा अनेक समस्या शहराला भेडसावीत आहेत .अक्कलकोट शहरात विकासाची कामे सुरू आहेत. पण ही कामे अत्यंत संथगतीने सुरू आहेत. या कामांमुळे नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रकार सुरू आहे. शहरात अनेक कामांसाठी रस्ते खोदण्यात आले आहेत. यामुळे सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले आहे. धुळीमुळे अबालवद्धानां  अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. तीर्थक्षेत्र अक्कलकोट शहरात श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी दररोज हजारो परगावचे भाविक भक्त हे येत असतात. शहरात आल्यानंतर परगावच्या भाविकांना वाहन पार्किंगची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावीत आहे. गर्दीच्या वेळी शहरातील वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे. अक्कलकोट शहराचा पाणीपुरवठ्याचा प्रश्न ऐरणीवर आहे. अक्कलकोट शहरात कुरनूर धरणातून पाणीपुरवठा सुरू आहे. आजच्या वेळी कुरनूर धरणात मुबलक पाणी असूनही अक्कलकोट शहरात आठ ते दहा दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. म्हणजे महिन्यातून केवळ तीन ते चार वेळाच पाणीपुरवठा सुरू आहे. अक्कलकोट शहरातील रस्त्यांची मोठी दुरावस्था झाली आहे. अक्कलकोट शहरातील स्वच्छतेबाबत नागरिकात तक्रारी वाढले आहेत. अक्कलकोट शहरातील अनेक भागात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. अक्कलकोट शहरातील मूलभूत समस्यांकडे प्रशासकीय काळात दुर्लक्ष करण्यात आले. आता नव्या नगराध्यक्ष ,उपनगराध्यक्ष व सर्वपक्षीय नगरसेवकांकडून नागरिकांच्या शहर विकासासंदर्भात अपेक्षा वाढल्या आहेत. तीर्थक्षेत्र अक्कलकोट नगरीचा विकास हा राज्यातील इतर तीर्थक्षेत्रांच्या धरतीवर व्हावा यासाठी नूतन नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांना प्रयत्न करावे लागणार आहेत. अक्कलकोट विधानसभेचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी अक्कलकोट शहराच्या विकासासाठी शासनाकडून कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. अक्कलकोट शहरात तीर्थक्षेत्र विकास निधीतून कामे सुरू आहेत. अक्कलकोट शहराच्या विकासासाठी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. आता शहराच्या नव्या कारभाऱ्यांना शहरात जी कामे सुरू आहेत त्यांचा दर्जा पाहणे तसेच सदरची कामेही मुदतीत होण्यासाठी प्रशासनावर दबाव टाकण्याचे काम करावे लागणार आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली नूतन नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी व त्यांच्या सहकाऱ्यांना अक्कलकोट शहर विकासाचे आव्हान पेलावे लागणार आहे.अक्कलकोट नगर परिषदेत सर्वपक्षीय सदस्य तसेच नगराध्यक्ष हे  उच्चशिक्षित असून या सर्वच लोकनियुक्त सदस्यांकडून अक्कलकोटकराच्यां विकासा संदर्भात अपेक्षा वाढल्या आहेत. 

वटवृक्ष मंदिर परिसरात मोठया प्रमाणात अतिक्रमण अरुंद रस्ते वाहतुकीची कोंडी परिसरातुन शहरवासीयाना जाणे येणे जिकरीचे यावर त्वरीत उपायोजना या समस्याकडे होणारे दुर्लक्ष भाविकाना होणारा त्रास यामुळे अक्कलकोट ची प्रतिमा बदलणे मोठे आव्हान असणार आहे .

Post Views: 42
Previous Post

जिल्ह्यात अस्तीत्वासाठी लढणारी राष्टृवादी काँग्रेस कुर्डू व भोसरे गटात सेफ झोनमध्ये

Next Post

बँक ऑफ महाराष्ट्र पंढरपूर शाखेतर्फे हार्वेस्टिंग मशीनसाठी अर्थसहाय्य

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

बँक ऑफ महाराष्ट्र पंढरपूर शाखेतर्फे हार्वेस्टिंग मशीनसाठी अर्थसहाय्य

ताज्या बातम्या

महानगरपालिका आयुक्त सचिन ओंबासे यांच्या नावाने सोशल मीडियावर बनावट खाते तयार करण्यात आले.#public

February 14, 2026

दिव्यांग नाट्य स्पर्धेत सोलापूरच्या नॅब संस्थेतील कलाकारांनी मिळवले नाटय स्पर्धेत यश. #vairal

February 14, 2026

कर्मवीर विद्यालयाच्या पाच विद्यार्थ्यांची खेळाडूची राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी स्पर्ध निवड

February 14, 2026

वंदे भारत रेल्वे मध्ये साप सोडणाऱ्या माथेफिरु जगन भालेला अटक. #public #marathinews #solapurnews

February 14, 2026

शेटफळ येथे करमाळा पंचायत समिती सदस्य सोनारी तक एक यांचा सत्कार

February 14, 2026

राज्यस्तरीय अश्व नृत्य स्पर्धेत करमाळचा बादशहा अश्व प्रथम

February 14, 2026

शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळातर्फे शिवजयंती उत्सवाला प्रारंभ !

February 14, 2026

रामदासी कीर्तनकार ह.भ.प.दीपाताई भंडारे यांच्या सुश्राव्य कीर्तनास सातारकर श्रोत्यांचा उस्फूर्त प्रतिसाद

February 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0679375

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697