सोलापूर – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी परीक्षेसाठी अर्ज भरण्याकरिता विद्यार्थ्यांना पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. आता विलंब शुल्कासह दि. २८ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत विद्यार्थी अर्ज भरू शकणार आहेत. या तारखेनंतर अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ दिली जाणार नाही, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी दिली आहे. नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज शाळा प्रमुखांमार्फत युडायस प्लसच्या पेनआयडीवरून भरायचे आहेत. तर पुनर्परीक्षार्थी, खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार आणि आयटीआयमधून ट्रान्स्फर ऑफ क्रेडिट घेणारे विद्यार्थी यांची अर्ज प्रक्रिया संकेतस्थळावरून पूर्ण करण्यात येणार आहे. परीक्षा शुल्क आरटीजीएस/एनईएफटीद्वारे १४ नोव्हेंबरपर्यंत भरायचे आहे, तर प्रिलिस्ट व चलन विभागीय मंडळाकडे १७ नोव्हेंबरपर्यंत सादर करणे आवश्यक आहे. १० नोव्हेंबर मिळालेल्या या वाढीव मुदतीचा लाभ विद्यार्थ्यांनी घेण्याचे आवाहन परीक्षा मंडळाने केली आहे.
….
…,
दहा नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
….
राज्य परीक्षा मंडळाकडून दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यासाठी पुन्हा मुदतवाढ दिली आहे. यामुळे पूरग्रस्त व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे. परीक्षा अर्ज भरणार्या विद्यार्थ्यांनी दहा नोव्हेंबर पर्यंत प्रशालेत अर्ज सादर करावे.
बसवराज कुमठेकर, प्राचार्य,
लोकसेवा विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय मंद्रूप
.,…
















