सांगोला – लोणेरे (जि.रायगड) येथे तिरंदाज चाचणी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च, सांगोला येथील प्रथम वर्ष मध्ये शिक्षण घेत असलेली विद्यार्थिनी प्राजक्ता जाधव हिची दि.२४ ते ३१ ऑक्टोबर रोजी पंजाब येथील गुरूकाशी विद्यापीठ भंटिडा येथे होणा-या आंतर विद्यापीठ तिरंदाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
यासाठी क्रिडा शिक्षक बिरा वगरे, मोहन वाघमारे यांचे प्राजक्ता जाधव हिला मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल फॅबटेक टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा नीलवर्णा रूपनर, उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर, सचिव डॉ.अमित रूपनर, कार्यकारी संचालक दिनेश रूपनर, इस्टेट डायरेक्टर डॉ.संजय आदाटे, व्यवस्थापक प्रतिनिधी प्रा.प्राजक्ता रूपनर, प्राचार्य रविंद्र शेडगे, उपप्राचार्या डाॅ.विद्याराणी क्षीरसागर, डाॅ.ज्योती शिंदे, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी प्राजक्ता जाधव हिचे अभिनंदन केले.