अक्कलकोट – सखोल अभ्यास, कठोर परिश्रम, जिद्द, चिकाटी, विषय आणि आशय समजून घेऊन मांडण्याचे कौशल्य यासोबतच आत्मविश्वासाची जोड असेल तर जीवनातील कोणत्याही परीक्षेत निश्चित यश मिळते असे मत सी. बी. खेडगी महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. शिवराया आडवीतोट यांनी व्यक्त केले. बोरगाव दे. येथील विद्या विजय प्रशालेत इयत्ता दहावीच्या निरोप समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव तथा बोरगाव चे माजी सरपंच विलासअप्पा सुरवसे हे होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ संचालक आनंदप्पा कलशेट्टी, खजिनदार प्राध्यापक प्रकाश सुरवसे उपस्थित होते
प्रारंभी मुख्याध्यापक अरुण पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी पुढे बोलताना आडवीतोट म्हणाले, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये खरी गुणवत्ता असून देशाच्या आणि राज्याच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या ग्रामीण मुलांनीच वेगवेगळ्या क्षेत्रात क्रांती घडवली आहे. त्यामुळे मी ग्रामीण भागातील विद्यार्थी आहे हा न्यूनगंड बाजूला ठेवून धाडसाने पुढे जा अशा शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना प्रा. प्रकाश सुरवसे यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेतील उत्तरलेखनाबद्दल महत्वाचे सल्ले देऊन परीक्षेसंदर्भात उपयुक्त माहिती दिली.
यावेळी दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. पाचवी ते दहावीपर्यंच्या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी विश्वनाथ हत्तरके, सुधीर बिराजदार, भाग्यकांत कल्याणी, अलिशा मकानदार, राजू हुक्कीरे, स्वामींनाथ स्वामी उपस्थित होते. सूत्रसंचालन मुशताक शेख यांनी केले तर गुरुशांत स्वामी यांनी आभार मानले.


























