सोलापूर – केंद्र शासनाच्या विद्यापीठ अनुदान आयोगाने फेब्रुवारी 2026 मध्ये बनावट विद्यापीठाची यादी जाहीर केली असून त्यात देशात 32 विद्यापीठ व महाराष्ट्रातील दोन विद्यापीठाचा समावेश आहे. नागपूरच्या राजा अरेबिक विद्यापीठासह सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील तडवळच्या नॅशनल बॅकवर्ड कृषी विद्यापीठाचा समावेश आहे.
कृषी शिक्षण आणि संशोधनावर लक्ष केंद्रीत करणारे तडवळ रेल्वे स्टेशन (प्लॉट नंबर1040) राष्ट्रीय मागासवर्गीय कृषी विद्यापीठ (स्वायत्त) हे अनाधिकृत संस्थात्मक केंद्र 2014-2016 दरम्यान सुरू झाले असून विज्ञान शाखेतील कृषी डिप्लोमा आणि बी.एससी (कृषी) यासारखे अभ्यासक्रम चालवतात विद्यार्थ्यांनी या विद्यापीठात प्रवेश घेऊ नये असे आवाहन विद्यापीठ अनुदान आयोगाने केले आहे.
लोकपाल बंधनकारक, पुण्यातील क्रीडा विद्यापीठाचा समावेश
तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाने विद्यार्थी तक्रार निवारण नियम 2023 अंतर्गत देशातील प्रत्येक विद्यापीठाने लोकपाल नियुक्त करणे बंधनकारक आहे. या निर्णयामागील मुख्य उद्धेश विद्यार्थ्यांच्या तक्रारीचे पारदर्शक आणि वेळेत निवारण करणे हा आहे. यात देशातील 29 विद्यापीठाचा समावेश असून महाराष्ट्रातील बालेवाडी पुणे येथील आंतराराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाचा समावेश आहे.
























