सोलापूर : अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आपल्या मनोगतातून शाळा व शिक्षक यांनी त्यांच्या शालेय जीवनात शिस्त, संस्कार व गुणवत्ता वाढीसाठी घेतलेल्या कठोर मेहनती बद्दल कृतज्ञता व्यक्त केली. अध्यक्षीय भाषणात सौ.शारदा चौगुले मॅडम (सचिवा) शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रामध्ये मुली व महिलांच्या वाढत्या सहभागाबद्दल कौतुक केले व विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. शहाजी नीळ यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व मेहनत, परिश्रम घेऊन सर्वश्रेष्ठ यश संपादन करा, असा एका प्रेरक कथेच्या माध्यमातून संदेश दिला. दहावी वर्गातील कुमारी श्रीवेनी कुचन या विद्यार्थिनीला प्रशालेतील स्टुडन्ट ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेकडून अल्पोपहार देण्यात आले.
याप्रसंगी संस्था सदस्य श्री. शंकर चौगुले साहेब व सौ. रेणुकाताई बुधाराम (कवयित्री), शाळेचे संस्था सदस्य श्री. नागराज चौगुले सर सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीमती. गुर्रम मॅडम व सौ .रमा हिबारे मॅडम, श्री. मोरे सर व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन नववी वर्गातील विद्यार्थिनी कु.अलेक्या कोंडुर, कु.मीनाक्षी गायकवाड केले तर आभार प्रदर्शन कु.मेघा कुरापाटीने केले.






















