सांगोला/विशेष प्रतिनिधी : मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांची बदली इचलकरंजी येथे झाली आहे. सांगोला पोलीस स्टेशनच्यावतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मृतीभावन टाऊन हॉल येथे निरोप समारंभ आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमात पत्रकार बांधव, पोलीस पाटील, विविध सामाजिक संघटना व सांगोला पोलीस स्टेशनचे अधिकारी-कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून विक्रांत गायकवाड यांचा सन्मान केला आणि त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
मंगळवेढा विभागात गेल्या दोन वर्षांपासून कार्यरत असलेले उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांनी सांगोला तालुक्यातील दोन महत्त्वाच्या निवडणुका तसेच अनेक गुन्हेगारी व सामाजिक विषय अत्यंत संयम आणि शांतीने हाताळले. त्यांच्या प्रामाणिक कार्यशैली, शांत स्वभाव आणि संघटन कौशल्याचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी गायकवाड सरांनी सर्व उपस्थितांचे आभार मानत सांगोला पोलीस व स्थानिक नागरिकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.