सोलापूर – राज्यात विक्रमी उलाढालीसाठी अव्वल क्रमांकाची असणाऱ्या सोलापूर बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांसाठी नव्याने शेतकरी भवन उभारण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या मुलांसाठी यापूर्वी बनवण्यात आलेले विद्यार्थ्यांचे वस्तीगृह बंदाअवस्थेत आहे. त्या वस्तीगृहाचे नूतनीकरण करून त्या ठिकाणी शेतकरी भावांनो उभारण्याचा निर्णय सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळानी घेतला आहे. या निर्णयामुळे बाजार समितीचा वेळ आणि पैशाची देखील बचत होणार आहे.
दरम्यान, माजी सभापती विजयकुमार देशमुख यांच्या कार्यकाळात बाजार समितीची जुनी इमारत पाडून त्याठिकाणी शेतकरी भवन बांधण्याचा निर्णय संचालक मंडळानी घेतला होता. परंतु एका आडत्याने त्या निर्णया विरोधात न्यायालयात गेल्याने देशमुख यांच्या कार्यकाळात शेतकरी भवन बांधकामाचा मुहूर्त काही केल्या लागला नाही. मात्र सध्याचे सभापती दिलीप माने यांनी शेतकरी भावनासाठी आग्रही भूमीका घेतली आहे.
सोलापूर बाजार समितीच्या विद्यार्थ्यांच्या जुन्या वस्तीगृहामध्ये शेतकरी भवनची सोय करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या या वस्तीगृहामध्ये एकही विद्यार्थी राहत नाही. बाजार समितीची ही जागा गेल्या अनेक वर्षापासून तशीच धुळखात पडून आहे. त्यामुळे बाजार समितीने या जुन्या वस्तीगृहामध्ये आता शेतकरी भवन बांधून शेतकऱ्यांची सोय करणार आहे. त्यासाठी जवळपास ८४ खोल्या आहेत. शिवाय स्वच्छतागृहाची देखील व्यवस्था याठिकाणी आहे. शिवाय नव्याने शेतकरी भवन बांधकाम करायचे म्हणले तर जवळपास १० ते १२ कोटी रूपये इतका खर्च अपेक्षित आहे. मात्र वस्तीगृहाच्या ठिकाणी शेतकरी भवन बांधकामाची सोय केली. तर हा खर्च केवळ एक कोटीमध्ये होणारा आहे. त्यामुळे जुन्याचं इमारतीला नूतनीकरण करण्यात येणार असल्याचे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्र.सचिव अतुल राजपूत यांनी सांगितले.
चौकट
पूरग्रस्तांचा ५१ लाखाचा निधी शासनाला
सोलापूर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक महापूर आल्याने शेतकऱ्यांचे आणि नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याच पूग्रस्तांना ५१ लाख रूपये देण्यात येणार आहे. त्यासाठी आम्ही वस्तू स्वरूपात पूरग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु जिल्हाधिकारी यांनी शासनाला तो निधी वर्ग करण्याबाबत चर्चा केली आहे. त्यामुळे सध्या पूरग्रस्तांना कीट पेक्षा इतर मदतीची आवश्यकता असल्याचेही सभापती माने यांनी सांगितले.
कोट
जुन्या इमारतीचे नूतनीकरण करून शेतकरी भवनची निर्मिती
सोलापूर बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांसाठी भवनची मागणी बऱ्याच दिवसापासून आहे. तरी आम्ही जुने वस्तीगृहाच्या ठिकाणी शेतकरी भवनची सोय करणार आहोत. त्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी सर्व सुविधा देता येणार आहे.
दिलीप माने, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर.