तभा फ्लॅश न्यूज/मुदखेड : गेल्या आठवड्या भरापासून मुदखेड शहर व परिसरात कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू असून या पावसामुळे पिंपळकौठा मगरे तालुका मुदखेड येथील तलाव फुटल्याने शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाचे नुकसान झाले असून शासनाकडून पिकांची नुकसान भरपाई मिळावी यासाठी शेतकऱ्यांनी तहसीलदार आनंद देऊळगावकर यांना निवेदन दिले आहे.
मुदखेड तालुक्यात कमी अधिक प्रमाणात गेल्या आठवड्या भरापासून पावसाने जोर धरला आहे नदी नाल्यांना पूर येत असून या पुराच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे दरवर्षी प्रचंड प्रमाणात नुकसान होते या पावसामुळे पिंपळकौठा (मगरे) येथील तलाव फुटल्याने तलावाचे पाणी शेजारी असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात शिरल्याने शेतकऱ्यांचे उभे पीक पाण्यात गेले आहे यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे यात केळी तुर कापूस सोयाबीन आधी पिकांचे नुकसान झाले आहे भागातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तहसीलदार आनंद देऊळगावकर यांच्याकडे नुकसान भरपाई मिळावी म्हणून निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी निवेदनकर्ते भाजपा तालुका सरचिटणीस सचिन मगरे, माजी नगरसेवक संजय आऊलवार, मुन्ना चौधरी,केशव पवार, सदाशिव अंजनवार, माधव पवार, गोविंद एलसटवाड,माधव दासरवाड, बळीराम दासरवाड, भगवान हेमके, शिवाजी उत्तम हेमके, मारुती काळेवार,सुलोचना हेमके, बळीराम हेमके,मारोती मादिलवाड, मारोतराव जाधव, श्रीराम हेमके, प्रकाश हेमके, बालाजी मादीलवाड, व्यंकटी मादीलवाड या शेतकऱ्यांनी तहसीलदार आनंद देऊळगावकर यांच्याकडे निवेदनाद्वारे नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!
तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...