पारध / जालना – भोकरदन तालुक्यातील पारध येथील तीनशे पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई साठी लागणारे कागदपत्र न दिल्यामुळे शासन स्तरावरुन अनुदान मंजूर झालेले असूनही अनुदान शेतकऱ्यांना मिळालेले नाही. त्यासाठी गावस्तरावरील तलाठी, कृषि सहाय्यक , ग्रामसेवक यांच्यामार्फत लागणारे कागदपत्र त्यामध्ये बँक पासबुक ,फार्मर आयडी ,आधार कार्ड व मोबाईल नंबर ,एकूण जमिनीचा दाखला हे कागदपत्र जमा करण्यासाठी करण्यासाठी यापूर्वीही प्रयत्न करण्यात आले होते. तरी देखील अद्यापही शेतकऱ्यांनी कागदपत्र न जमा केल्यामुळे शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत. त्या सर्वांनी कागदपत्र जमा करून करुन घ्यावे, असे आवाहन तलाठ्यांनी यांनी केले आहे.
शेतकरी मदतीच्या अनुदानापासून वंचित –
भोकरदन तालुक्यातील पारध येथील 2025 चे नुकसाभरपाईची पासून शेतीपिकाच्या नुकसानीचे अनुदान वितरित करण्यासाठी वेळोवेळी शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत. त्यानुसार, शेतकऱ्यांना शासनस्तरावरून डीबीटी प्रणालीद्वारे अनुदान वाटप करण्यात आलेले आहे. मात्र पारध येथील शेतकऱ्यांनी लागणारे कागदपत्र जमा केले नसल्यामुळे शासन स्तरावरून अनुदान मंजूर झालेले असूनही अनुदान शेतकऱ्यांना मिळालेले नाही.
अतिवृष्टी 2023 चे शेतकरी अनुदानापासून वाऱ्यावर…
मागच्या दोन वर्षात दोन ते तीन तलाठी बदलून गेले वारंवार कागदपत्र देऊन सुद्धा जवळपास दीडशेपेक्षा जास्त शेतकरी अतिवृष्टी अनुदानापासून अजून पण वंचित आहे वारंवार संबंधित अधिकाऱ्यांना शेतकरी जाऊन भेटतात काही शेतकऱ्यांचे विके नंबर सुद्धा जनरेट झाले आहे तर काही शेतकऱ्यांचे अजून यादीमध्ये नाव सुद्धा नाही आता या शेतकऱ्यांचं काय असा प्रश्नचिन्ह निर्माण झालं..?
सागर देशमुख (सामाजिक कार्यकर्ते)
2023 मध्ये सुद्धा अतिवृष्टी झाली होती त्यावेळेस पण काही शेतकऱ्यांचे कागदपत्र अभावी व विके नंबर जनरेट होऊन सुद्धा अतिवृष्टी अनुदान शेतकऱ्यांना मिळाले नाही,तसेच आता सुद्धा नुकसान भरपाईचा अनुदान शेतकऱ्यांना भेटायला अडचण यायला नको त्यामुळे संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना सहकार्य करून त्वरित अनुदान वाटप करावे व शेतकऱ्यांनी सुद्धा लागणाऱ्या कागदपत्राची पूर्तता करून लवकर तलाठी , कृषी सहाय्यक व ग्रामसेवक यांना कागदपत्र द्यावे.
कोट:- चेतन राजपूत (तलाठी पारध)
पारध येथील बरेच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला आहे पण काही शेतकरी यांचे कागदपत्र अपुरे असल्यामुळे व काही शेतकऱ्यांनी कागदपत्र जमा न केल्यामुळे त्यांचे अनुदान हे रखडले आहे त्यांचे सुद्धा कागदपत्र लवकर जमा करून त्यांना सुद्धा अनुदान त्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी पूर्ण मदत करण्यात येईल.
नुकानभरपाई शेतकऱ्यांनी ज्या खातेदारांनी फार्मर आयडी किंवा शेतकरी ओळख क्रमांक अद्याप पर्यंत तयार केले नाही अशा सर्व खातेदारांनी आपले शेतकरी ओळख क्रमांक तयार करून घ्यावे नसता अनुदान करिता फार्मर आयडी किंवा शेतकरी ओळख क्रमांक तयार केले नसेल अशा खातेदारांना VK No द्वारे KYC प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.























