भोकर / नांदेड – वातावरणातील सततच्या बदलामुळे येणाऱ्या विविध आपत्तींना तोंड देऊन शेतकऱ्यांना सक्षम बनविणारी तसेच उत्पादनातील होणारी घट लक्षात घेऊन शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्मितीवर भर देणारी कृषी समृद्धी योजना सन २०२५-२६ नाविन्यपूर्ण योजनेचा भोकर तालुक्यातील शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहन दिलीप जाधव तालुका कृषि अधिकारी भोकर यांनी केले आहे.
कृषि समृद्धी योजनेमध्ये नाविन्यपूर्ण विविध बाबींचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये किसान ड्रोन योजनेचे भोकर तालुक्यास १ लक्षांक असून किंमतीच्या ५०टक्के किंवा पाच लाख रुपये अनुदान, जैविक निविष्ठा संसाधन केंद्र (बी आर सी) स्थापन करणेचे दोन लक्षांक असून किंमतीच्या ७५ टक्के किंवा एक लाख (शेतकरी गट) व पाच लाख(शेतकरी उत्पादक कंपनी )अनुदान, काढणी पश्चात शेतमाल थेट विक्रीसाठी फिरते वाहन विक्री केंद्र सुविधा योजनेचे किंमतीच्या ५०टक्के किंवा सात लाख रुपये अनुदान, जिल्ह्यातील शेतकरी प्रशिक्षण केंद्रांचे बळकटीकरण योजनेचे एक लक्षांक असून १००टक्के २०.०० लाख अनुदान, पीक प्रात्यक्षिका अंतर्गत चिया सीड्स प्रकल्प योजनेचे ४० हेक्टर लक्षांक असून ८५००/- रुपये प्रति हेक्टर १००% अनुदान, पीक प्रात्यक्षिका अंतर्गत मका प्रकल्प साठी १५०००/- प्रति हेक्टर अनुदान, कॉटन श्रेडर साठी ७५०००असून किंमतीच्या ५०% अनुदान, क्रॉप रिपर (सोयाबीन कापणी यंत्र) साठी ८५०००/किंमतीच्या ५०% अनुदान, स्पायरल सेपरेटर साठी ४५००/प्रति रुपये किंवा किंमतीच्या ५०% अनुदान या बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे.
इच्छुक शेतकऱ्यांनी तालुका कृषि अधिकारी यांचेकडे अर्ज सादर करण्याचे आवाहन तालुका कृषि अधिकारी भोकर दिलीप जाधव यांनी केले आहे. ही योजना ऑफलाईन पद्धतीने अर्ज घेऊन DBT तत्वावर राबविण्यात येणार आहे. लक्षांका पेक्षा जास्त अर्ज आल्यास लॉटरी पद्धतीने निवड करण्यात येईल.तरी इच्छुक शेतकऱ्यांनी १८ नोव्हेंबर २०२५ पर्यंत तालुका कृषि अधिकारी कार्यालयात अर्ज भरून अर्जामधील नमूद आवश्यक कागदपत्रसह अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले.


















