▶️ मुखेड – कंधार विधानसभा मतदारसंघातीर सर्व शेतकरी बांधवांनी मोफत स्वरूपात असलेल्या केवळ १ रुपया भरुन प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होऊन आपल्या पिकांचे विमा संरक्षण करून विमा योजनेचा लाभ घ्यावा
मुखेड प्रतिनिधी / अँड. रणजित जामखेडकर
चालू खरिप हंगामापासुन राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोफत स्वरूपात असलेल्या प्रति अर्ज केवळ १ रु. भरुन पिक विमा भरण्याची योजना मागील वर्षीपासून राज्यातील भाजपा सरकारने सुरू केली आहे. या मोफत स्वरूपात असलेल्या योजनेत सहभागी होण्यासाठी प्रधानमंत्री पिक विमा पोर्टलवर नोंदणी सुरु आहे.
शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभाग नोंदवून या योजनेचा लाभ घ्यावा , असे आवाहन मुखेड – कंधार विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आ. डॉ. तुषार राठोड यांनी केले आहे . प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी शेतकऱ्यांसाठी आधार कार्ड , पिक पेरा अहवाल , मोबाईल क्रमांक , सातबारा , ८ अ , बँक पासबुक इ. बाबींच्या कागदपत्रांची आवश्यकता लागणार आहे.
या योजनेत पुढील बाबीचा समावेश करण्यात आला आहे . हवामान घटकांच्या प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थिती मुळे पिकांचे होणारे नुकसान , पिक पेरणीपासून काढणीपर्यतच्या कालावधीत नैसर्गिक नैसर्गिक आग , वीज कोसळणे , गारपीट , वादळ , चक्रीवादळ , पुर , क्षेत्र जलमय होणे , भुस्खलन , दुष्काळ , पावसातील खंड , किड व रोग इत्यादी बाबीमुळे हंगामाच्या शेवटी येणारी घट स्थानिक नैसर्गिक कारणांमुळे होणारे उत्पन्नात आपत्तीमुळे पिकांचे नुकसान , नैसर्गिक कारणांमुळे पिकांचे होणारे काढणीपश्चात १४ दिवसांपर्यंत नुकसान या बाबींचा समावेश आहे .
या योजनेतील समाविष्ट पिके सध्याच्या अपुऱ्या याप्रमाणे आहेत . पिक वर्गवारी पाऊसामुळे सोयाबीन , कापूस यासारख्या पिकांची तृणधान्य व कडधान्य पिके यात खरीप हंगामातील भात ( धान ) , खरीप ज्वारी , बाजरी , नाचणी ( रागी ) , मुग , उडीद , तुर , मका या आठ पिकांचा व रब्बी हंगामातील गहु ( बागायत ) , रब्बी ज्वारी
( बागायत व जिरायत ) हरभरा , उन्हाळी भात या ४ रब्बी हंगामातील पिकाचा समावेश आहे . गळीतधान्य पिकामध्ये खरीप हंगामातील भुईमुग , कारळे , तीळ , सूर्यफूल , सोयाबीन या ५ पिकांचा तर रब्बी हंगामातील भुईमुग या पिकाचा समावेश आहे . नगदी पिकामध्ये खरीप हंगामातील कापुस , खरीप कांदा या दोन तर रब्बी कांदा या रब्बी हंगामातील पिकाचा समावेश आहे .
उन्हाळी महसूल मानकापेक्षा मुख्य मंडळात कमी विहित पेरणी झाल्यास शेतकऱ्यांना विनापेरणी साठी विमा संरक्षण लाभणार आहे . शेतकऱ्यांनी पिक विमा भरण्यासाठी दि.१५ जुलै आहे परंतु शेवटच्या तारखेची वाट पाहु नये शेवटच्या तारखेला विमा भरण्यासाठी संकेतस्थळावर ताण येवून संकेतस्थळ चालत नाही . अशा कारणामुळे शेतकरी विमा भरण्यापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही . शेतकऱ्यांनी त्वरीत भरण्याची कार्यवाही यामुळे विमा करावी , असे आवाहन मुखेड – कंधार विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय युवा आमदार डॉ. तुषार राठोड यांनी केले आहे.