नवीन नांदेड प्रतिनिधी
भारतातील प्रमुख तीन फौजदारी कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आल्याने नवीन कायद्ये विषय जनतेस माहिती देण्यासाठी दिनांक १ जुलै २०२४ रोजी १२ वाजता ग्रामीण पोलीस ठाणे येथे पोलीस पाटील, नागरी, पत्रकार , शाळा, विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक यांना माहिती पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांनी दिली. तर ठाण्यात नवीन कायद्यान्वये गुन्हा दाखल ही करण्यात आला आहे .
भारतातील प्रमुख तीन कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आलेल्या कायदे
भारतीय न्याय संहिता -२०२३, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता – २०२३, भारतीय साक्ष अधिनियम- २०२३ याप्रमाणे कायद्यामध्ये बदल करण्यात आले आहेत.
या तिन्ही कायद्यांना भारत सरकारने अधिसूचना जारी करून मंजुरी दिली असल्याने १ जुलै २०२४ रोजी पासून तिन्ही कायदे संपूर्ण भारतात अमलात आले असून नवीन कायद्याची अंमलबजावणी करत नवीन कायद्याची माहिती सहजरीत्या प्राप्त होण्याकरिता दिनांक १ जुलै २०२४ रोजी नांदेड पोलीस दलाकडून जिल्हा अंतर्गत ग्रामीण पोलीस ठाणे येथे नवीन कायद्याची जनजागृती बैठकीच्या आयोजन करून दिनांक १ जुलै २०२४ रोजी पोलीस निरीक्षक नागनाथ आईलाने यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामीण पोलीस ठाणे परिसरातील पोलीस पाटील, नागरी, पत्रकार, शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी व शिक्षक यांना नवीन कायदेविषयक माहिती देण्यात आली.
यावेळी या बैठकीस परिसरातील पोलीस पाटील, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक, पत्रकार, शाळा, महाविद्यालय तील विद्यार्थी व शिक्षक यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती तर नवीन कायद्यानुसार ग्रामीण ठाणे येथे एका गुन्ह्याची नोंद ही करण्यात आली असल्याची माहिती ठाणे आमलदार परमेश्वर कदम यांनी दिली