पारध / जालना – इच्छाशक्ती दाखवत, जिद्द, चिकाटी,सातत्याच्या जोरावर प्रतिकुल परिस्थितीवर मात करत स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये (सिव्हिल इंजिनिअरिंग) परीक्षेत उत्तुंग यश मिळवत एका शेतकऱ्याचा मुलगा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक झाला आहे.राहुल भगवान सावळे असे तरुणाचे नाव आहे.
जिद्द आणि परिश्रम घेण्याची तयारी असली की, कठीण परिस्थितीवर मात करून यशाला गवसणी घालता येते. अशीच भोकरदन तालुक्यातील पारध येथील राहुल भगवान सावळे याने अतिशय खडसर प्रयत्नतून स्थापत्य अभियांत्रिकी महानगरपालिका नागपूर येथे सहाय्यक म्हणून नोकरी मिळविली आहे.
रायघोळ नदीच्या पायथ्याशी असलेल्या पारध मध्ये राहुल याचा जन्म एका सर्वसामान्य धनगर कुटुंबात झाला. आई-वडील शेती करून कुटूंबाचा उदरनिर्वाह करत संसाराचा गाडा हाकत आहे. राहुल हा लहानपणापासून हुशार, जिद्दी, अभ्यासू आणि जिज्ञासू वृत्तीचा तरुण होता. त्याच्या या जिद्दीमुळेच त्याने स्थापत्य अभियांत्रिकी महानगरपालिका नागपूर येथे पदाला गवसणी घातली आहे.
राहुल चे प्राथमिक शिक्षण पारध जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले, तर शासकीय तंत्रनिकेतन गव्हर्मेंट कॉलेज संभाजीनगर येथे पूर्ण झाले झाले आहे. त्यानंतर त्याने स्थापत्य अभियांत्रिकी च्या परीक्षेची तय्यारी करणे सुरू केले. अखेर खडतर प्रवासातून त्याने घवघवीत यश प्राप्त करुन स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणून झाला आहे, खरंतर कोरोनाच्या काळामध्ये राहुलने दोन वर्ष घरी जाऊन सुद्धा शेतात जाऊन अभ्यास करायचा व आई-वडिलांना शेताचा हातभार लावू लागायचा. त्यामुळे राहुलच्या यशामागे आई-वडिलांचा पाठिंबा सुद्धा मोठ्या ताकतीने उभा होता.
त्यामुळे राहुल च्या यशाबद्दल पारध येथील ग्रामस्थ मध्ये विविध स्तरातून त्याचे अभिनंदन होत आहे. यामध्ये माझी सभापती पंचायत समिती परमेश्वर पाटील लोखंडे, सरपंच गणेश पाटील लोखंडे, ग्रामीण पत्रकार संघटनेचे रवींद्र सर लोखंडे, पत्रकार सागर देशमुख,गजानन देशमुख, शरद आबा देशमुख, गणेश तेलंग्रे, राजेंद्र देशमुख, सुभाष लोखंडे, सुरेश आल्हाट व आदी ग्रामस्थ उपस्थित होते, त्यावेळेस राहुलला शुभेच्छा दिल्या.
राहुल सावळे (स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक महानगरपालिका नागपूर)
मी मागच्या 5 वर्षापासून स्थापत्य अभियांत्रिकेचे परीक्षा देत होतो त्यात मला बऱ्याच वेळ अपयश आले, मध्यंतरी कोरोनाच्या काळात मला अभ्यास सोडून गावाकडे सुद्धा यावा लागला, त्यावेळेस वडिलांसोबत शेती करायचं मी ठरवल होत,पण वडील नाही म्हणायचे तू अभ्यास सगळं लक्ष दे त्यामध्येच आई-वडिलांच्या पाठिंबामुळे आज मला नोकरीला मिळाली, त्यामध्ये नोकरी मिळण्याचा मला जेवढा आनंद झाला तेवढाच आनंद माझ्या वडिलांचा गावकऱ्यांनी जो सत्कार केला तो कदाचित माझ्या नोकरी पेक्षाही मोठा असेल.



















