… (उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत चालली ; वैद्यकीय उपचार घेण्यास नकार)…… मंठा पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण सुरू……. मंठा/ प्रतिनिधी : सार्वजनिक विहिरीच्या जवळचे दगडाचे बेसमेंट व शेडचे अतिक्रमण काढावे, बौद्धविहारा कडे जाणाऱ्या सिमेंट काँक्रीट रस्त्यावरील पत्राचे शेड ठोकून केलेले अतिक्रमण काढावे या मागणीसाठी तळणी (ता.मंठा) येथील ग्रामस्थांनी 14 ऑगस्ट पासून पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. विशेष म्हणजे प्रशासनाचे दिरंगाईमुळे वर्षातून दुसऱ्यांदा आमरण उपोषण करण्यात येत आहे. दरम्यान उपोषणकर्त्यांपैकी काहींची प्रकृती खालावत चालली असली तरीही त्यांनी वैद्यकीय उपचार घेण्यास नकार दिल्याची माहिती समजते.
अतिक्रमण काढून द्या अन्यथा आमच्या अंत्यविधीला या अशा प्रकारचे बॅनर उपोषणकर्त्यांनी लावले आहे. 9 ऑगस्ट रोजी दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने उपोषणकर्त्यांनी 14 ऑगस्ट पासून उपोषण सुरू केलेले आहे. प्रशासनास अनेक वेळा निवेदन देऊनही अद्याप अतिक्रमण काढण्यात आलेले नाही. सदरील अतिक्रमण हटविल्याशिवाय आम्ही उपोषण सोडणार नाही. अशी भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे. या उपोषणकर्त्यांमध्ये गुलाब सदावर्ते, बाळू सदावर्ते, विनोद सदावर्ते, अंकुश सदावर्ते, संतोष सदावर्ते, बबन सदावर्ते, शिवाजी गायकवाड,पांडुरंग सदावर्ते, अभिजीत सदावर्ते यांचा समावेश आहे.