सोलापूर – विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन महीला अथलेटीक्स स्पर्धेमध्ये श्री सुशीलकुमार शिंदे कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशनची विद्यार्थीनीं आकांक्षा गावडे हिने २०० मीटर व ४०० मीटर धावणे या प्रकारात दमदार कामगिरी करत २ सुवर्णपदक घेत ही ट्रॅाफी पटकावली. या स्पर्धा दयानंद कॉलेज येथे संपन्न झाल्या.
या उत्कृष्ट कामगिरी बद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री.सुभाष चव्हाण, उपाध्यक्ष श्री.विवेक चव्हाण, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.कलाश्री देशपांडे प्रा.नागनाथ पुदे. प्रा.विजय तरंगे, श्री.सुनील राठोड, श्री.अनिल राठोड यांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.



















