दक्षिण सोलापूर – दिल्ली येथे सुरू असलेल्या गोभक्त महिला संमेलनामध्ये पश्चिम महाराष्र्टातील तीन महिला गोभक्तांचा सन्मान करण्यात आले असून यामध्ये दक्षिण सोलापूरच्या उमा बिराजदार यांचा समावेश आहे.
उज्वला खिल्लारी, सर्मथ गोशाळा , शिरूर तालुका ,छाया थोरात, श्रीराम गोशाळा ,
तालुका आंबेगाव व उमा बिराजदार कट्टेव्वादेवी गोशाळा , वडकबाळ तालुका दक्षिण व जिल्हा सोलापूर या ३ गोशाळा चालक गोभक्त महिलांना त्यांच्या उत्कृष्ट कामाबद्दल विश्व हिंदू परिषदेकडून सन्मान करण्यात आला. केंद्र गोभक्त महिला प्रमुख नंदिनी भोजराज यांच्या हस्ते महिला गोभक्तांना सन्मानित करण्यात आले.























