अकलूज – ग्रामपंचायतचे नगर परिषदेत रूपांतर झाल्यानंतर घरपट्टी, पाणीपट्टी व गाळे भाडेकरूंना शास्ती (२% व्याज) लावण्यात आले याबाबत निर्णय घेण्यासाठी अकलूज नगर परिषदेच्या कार्यालयात घेतलेल्या बैठकीत व्याज माफीसाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवीत असल्याचे उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी सांगितले.
सक्तीचे कर नागरिकांवरती आकारले गेले आहेत.ते २ टक्के कराची शासकीय माफी मिळावी अशी विनंती नागरिकांनी केली होती. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही काम करणार असून अभय योजना शासनाने काढली होती. त्याची मुदत १९/ ५/ २५ पर्यंत होती. त्यात वाढ मिळावी यासाठी आम्ही मीटिंग घेऊन ठराव करणार असून नागरी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करणार आहोत.असे मत अकलूज नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी झालेल्या बैठकीत व्यक्त केले. गाळेधारकांना घरपट्टी आकारली असून प्रॉपर्टी टॅक्स लावणे हा नगरपरिषदेचा अधिकार आहे. गाळेधारकांच्या हिताकरता आम्ही इतर नगरपरिषदेत कशी अंमलबजावणी झाली आहे. त्याचा अभ्यास करून विशेष मीटिंग घेऊन निर्णय घेऊ असे मत त्यांनी गाळेधारकांच्या प्रश्नावरती व्यक्त केले.या बैठकीस नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरपरिषदेचे अधिकारी, नगरसेवक उपस्थित होते.
• तक्रार निवारण न करताच नगरपरिषदेची कर आकारणी
अकलूज नगर परिषदेने प्रस्थापित करमुक्त निर्धारणेचेचे विवरण दिनांक २५ नोव्हेंबर २०२३ रोजी मुख्याधिकारी व कर विभाग प्रमुख यांच्या मार्फत नागरिकांना नोटीसा पाठविण्यात आल्या होत्या. मात्र या नोटिसांवर नागरिकांनी केलेल्या हरकती व तक्रारींचे अद्याप निवारण करण्यात आलेले नाही.
लावलेल्या जागा करा विरोधात सादर केलेल्या हरकती व आक्षेपांवर नगरपरिषद प्रशासनाने कोणताही अंतिम निर्णय दिलेला नाही. तसेच संबंधित तक्रारींचे निवारण न करता थेट कर आकारणी व वसुलीची प्रक्रिया सुरू ठेवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत नगरपरिषद प्रशासनाने नागरिकांच्या हरकती व तक्रारींचे योग्य निवारण करून त्यानंतरच कर आकारणीची प्रक्रिया करावी, तसेच प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा आहे.





















