तभा वृत्तसेवा,
सोलापूर – सोलापूर – विजयपूर महामार्गावरील सोरेगाव ते हत्तुर दरम्यान असणाऱ्या दुभाजकांमध्ये मोठ्या प्रमाणात काटेरी झाडांचे साम्राज्य वाढल्याचे दैनिक तरूण भारतमध्ये वृत्त प्रकाशित होताच काटेरी झाडे काढून फुलांच्या झाडांची छाटणी करण्यात आली आहे.
यामुळे वाहनचालक व प्रवाशांमधून दैनिक तरूण भारतचे आभार व्यक्त करण्यात येत आहे.
सोलापूर विजयपूर महामार्गावरील दुभाजकामध्ये काटेरी झाडे वाढल्याने वाहन चालकांना जखमा होत होते. याकडे राष्र्टीय महामार्ग विभागाचे दुर्लक्ष होत होते. दुभाजकावरील काटेरी झाडे काढण्यात यावे अन्यथा राष्ट्रीय महामार्गा कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा भंडारकवठेचे सरपंच भीमाशंकर बबलेश्वर यांनी दिला होता.
दैनिक तरूण भारतच्या वृत्ताची दखल घेऊन राष्र्टीय महामार्ग कार्यालयाकडून काटेरी झाडे काढून टाकण्यात आली आहेत. तसेच दोन वर्षांपासून फुलांच्या झाडांची छाटणी न केल्याने दुभाजकाबाहेर झाडांची वाढ झाली होती. राष्र्टीय महामार्ग कार्यालयाने दुभाजकाच्या सौंदर्यासाठी छाटणी केली आहे.
….
राष्र्टीय महामार्गा विभागाचे कौतुक
…
वाहनचालकाच्या त्रासाची दखल घेऊन राष्र्टीय महामार्ग विभागाने हत्तूर सोरेगाव रस्त्याच्या दुभाजकामधील काटेरी झाडे काढली आहेत. तसेच फुलांच्या झाडांची छाटणी केल्याने सौंदर्यात भर पडणार आहे. त्यामुळे राष्र्टिय महामार्ग विभागाबद्दल प्रवाशांमधून कौतुक होत आहे.
भीमाशंकर बबलेश्वर, सरपंच भंडारकवठे
…
























