टेंभुर्णी – समाजातील सर्व घटकांना शासनाच्या योजनांचा लाभसमानतेने मिळावा आणि कोणताही दिव्यांग बांधव मदतीपासून वंचित राहू नये, या हेतूने चव्हाणवाडी (टें) ग्रामपंचायतीतर्फे एक सामाजिक भान जपणारा उपक्रम राबविण्यात आला. जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून ग्राम पंचायतीने ५% दिव्यांग निधीतून १२ पात्र लाभार्थ्यांना प्रत्येकी २०००/- व १५% लोककल्याण अनुसूचित जाती जमातीतील १५ लाभार्थ्यांना प्रत्येकी २५००/- रुपये प्रमाणे आर्थिक सहाय्य वितरित करून त्यांच्या स्वावलंबनाच्या वाटचालीस हातभार लावला.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना सरपंच सौ स्वाती चव्हाण यांनी सांगितले की, दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या हक्कांविषयी जागरूक करणे, आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे आणि समाजातील त्यांचा सहभाग वृद्धिंगत करणे हे ग्रामपंचायतीचे सातत्याने सुरू असलेले ध्येय आहे.
या वितरण कार्यक्रमाला तंटामुक्तीचे अध्यक्ष अरुण चव्हाण, माजी उपसरपंच हनुमंत चव्हाण, माजी सरपंच नवनाथ शिंदे, मा. चेअरमन राहुल चव्हाण, बाळासाहेब मोठे उपसरपंच अर्जुन सलगर, भागवत खडके, भाऊसाहेब सलगर, ग्रा.पं. सदस्य सुभाष इंदलकर, ग्रा.पं. सदस्य रमेश नांगरे, विजय आबा कदम, संग्राम चव्हाण, समाधान मिस्कीन, सागर चव्हाण, जावेद काजी, बापू मिस्कीन, गोविंद जगताप, ग्रामसेवक यादव, पदाधिकारी, युवा वर्ग यांच्यासह ग्रामपंचायतीचे सदस्य, नागरिक आणि लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमामुळे दिव्यांग बांधवांमध्ये आत्मविश्वास वृद्धिंगत होऊन त्यांच्या सामाजिक व आर्थिक सबलीकरणाला नवी दिशा मिळाल्याचे समाधान व्यक्त केले. सरपंच सौ. स्वाती चव्हाण
























