अक्कलकोट – जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा जेऊर या शाळेतील विद्यार्थी कु. अभिनव आळगी कथाकथन स्पर्धेत जिल्ह्यातून प्रथम आले आहे.
जिल्हा परिषद, सोलापूर व ओपन लिंक्स फाउंडेशन (विनोबा अँप, पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळां जेऊर मधील इयत्ता १ ली ते ८ वी विद्यार्थ्यांच्या जीवनकौशल्य विकासासाठी’ नन्हें सितारे’ हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
या उपक्रमांतर्गत स्पोकन इंग्लिश, स्टोरी टेलिंग, स्पेलिंग बी, पोएट्री रीक्शन या स्पर्धांमध्ये शालेय स्तरावर सराव करून विनोबा अँपवर व्हिडीओ अपलोड करण्यात आले होते. जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा एस आर पी एफ कॅम्प क्रमांक दहा येथे जिल्हास्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.यामध्ये इयत्ता दुसरीतील विद्यार्थी कु. अभिनव आळगी याचा प्रथम क्रमांक आल्याबद्दल अभिनंदन.या विद्यार्थीला. जिल्ह्यात प्रथम क्रमांक आल्याबद्दल सोलापूर जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी माननीय श्री कादर शेख जिल्हा विस्तार अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. त्याच बरोबर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी प्रशांत आरबळे , शिक्षण विस्तार अधिकारी सोमशेखर स्वामी , करजगी बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी लक्कप्पा पुजारी , जेऊर केंद्राचे केंद्रप्रमुख कृष्णात मोरे सर शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष शंकर अजगोंडे मराठी शाळेचे मुख्याध्यापक आमसिद्ध उमराणी कन्नड शाळेचे मुख्याध्यापक राजकुमार पाटील जेऊर गावचे पोलीस पाटील रहमान आतार यांनीही या विद्यार्थिचे गोडकौतुक केले. तसेच . अभिनवला मार्गदर्शक म्हणून मराठी शाळेचे शिक्षिका स्नेहल क्षीरसागर, संध्याराणी माने उर्मिला शिवगोंडे सुमित्रा जमादार संगमेश्वर कोणदे महादेव सोनार नागप्पा आळगी यांचा मार्गदर्शन लाभले. अजून या उपक्रमात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग होण्यासाठी शिक्षक व पालकांनी पुढाकार घ्यावा अशी आवाहन माननीय शिक्षणाधिकारी यांनी केले


























