सोलापूरचे लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांचा 75 हजाराच्या फरकाने पराभव झाला. काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे यांनी त्यांचा पराभव केला. महाराष्ट्रात या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने मोठे यश मिळवले. त्या नंतर भाजपच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपणाला जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी केली. सोलापुरात भाजपचा झालेला पराभव त्यामुळे आता अनुसूचित जाती मोर्चाचे माजी पदाधिकारी आणि लातूर लोकसभेला उमेदवारीची मागणी केलेले दिलीप शिंदे यांनी शहराचे अध्यक्ष नरेंद्र काळे यांनी राजीनामा देण्याची मागणी केली आहे. शिंदे यांनी या पराभवाचे खापर विधानपरिषदेचे आमदार श्रीकांत भारतीय यांच्यावरही फोडले आहे. दरम्यान सोलापुरातून शहर उपाध्यक्ष जय साळुंखे यांनी आपल्या पदाचा राजीनामा शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्याकडे दिला आहे. जय साळुंखे परिवहन समितीचे माजी सभापती आहेत. आपल्या पत्रामध्ये त्यांनी सोलापुरात भाजप उमेदवार राम सातपुते यांच्या झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत आपण हा राजीनामा देत असल्याचे सांगितले आहे.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...