कुर्डूवाडी – नगरपालिकेच्या निवडणूकीत राष्टृवादी काँग्रेसच्या नगराध्यक्षांचा परभव निच्छीतच मानला जात होता मात्र नगरसेवक पदाच्या उमेद्वारांच्या उज्वल यशाचे खरे मानकरी ” फाईव्ह डायमंड ” म्हणून जे पुढे आले ते बापू, दादा, बाबा,आण्णा अन बबलू हेच ठरले आहेत.या फाईव्ह डायमंडचे अचूक नियोजन, झंझावती प्रचाराच्या जोरावर भव्य यश संपादन केले. राष्टृवादी काँग्रेसचे नेते माजी आ.संजयमामा शिंदे यांनी शहराची संपुर्ण जबाबदारी या ” फाईव्ह डायमंड ” वर सोपवली होती.
कुर्डूवाडीचे राजकारण गेली कीत्तेक वर्षापासुन एक अपवाद वगळता स्थानिक निवडणूकीमध्ये नेहमीच शिवसेना धार्जिने ठरले आहे. मात्र विधानसभा असो वा लोकसभा निवडणूका असोत येथील मतदार हा माजी आ. बबनदादा शिंदे व आजी आ.संजयमामा शिंदे यांच्या विचारसरणीला मानून मतदानाला सामोरे जातो हा ईतिहास आहे.
यावेळेसच्या निवडणूकीसाठी मात्र फाईव्ह डायमंड म्हणजे बापूसाहेब जगताप,समिरआण्णा मुलाणी,दादा गोरे,बाबा गवळी व बबलू कांबळे यांनी अचूक नियोजन करून माजी आ.संजयमामा शिंदे यांना आपण मोठ्या ताकतीने लढून कशा पध्दतीने जिंकु शकते हे पटवून दीले.यावर अनेक बैठका निमगाव टे येथे संजयमामांच्या उपस्थीतीत झाल्या. निवडणूक जिंकायचीच या उदात्त हेतून स्वत: बापू जगताप यांनी दोन पावले मागे घेत स्वत: न निवडणूक लढवता पत्नीची उमेद्वारी फायनल केली. मुलगा माजी नगरसेवक आकाश जगताप यांना देखील उमेद्वारी नाकारत तडजोड करत निवडणूकीस सामोरे गेले. कुर्डूवाडीतील पार्टीच्या नेतृत्वाची जबाबदारी बापूसाहेब जगताप व माजी नगराध्यक्ष समिर मुलाणी यांनी घेतली. माजी उपनगराध्यक्ष दादा गोरे, माजी नगरसेवक बाबा गवळी तसेच संजयमामांचे कट्टर समर्थक विस्वासू बबलू कांबळे या तीघांना बरोबर घेत निवडणूकीच्या अगोदर दोन महान्यापासुन अचूक नियोजन केले.दादा गोरे व बाबा गवळी यांनी स्वत: उमेद्वारी नाकारत पार्टीसाठी त्यागी भूमिका घेतली.
मागील राष्टृवादी काँग्रेसबाबत शहरात असलेली नाराजी दुर करण्यात पार्टीच्या या पाच प्रमुख नेत्यांना यश आले. क्राँस वोटींग होवून पार्टीचा अथवा एखाद्या उमेद्वाराचा परभव झालाच तर पुन्हा माझ्याकडे निधी मागायला यायचे नाही असा सज्जड दम संजयमामा शिंदे या्ंनी या प्रमुख नेत्यांना जो दीला होता ते चँलेंज स्विकारत सर्वजण निवडणूकीला एकदीलाने सामोरे गेले आणी जबरदस्त असे यश मीळवत तेरा जागा जिंकत नगरपालिकेत स्पष्ठ बहुमत मीळवले.अर्थात विजयाचे खरे शिलेदार फाईव्ह डायमंड असले तरी यामागे अनेक दृष्य, अदृष्य हात आहेत ज्यांनी तिकीट नाकारले तरी पार्टीचे इमाने इतबारे काम केले आहे. पराभूत उमेद्वारांना स्विकृत सदस्य म्हणून संधी न देता स्विकृत सदस्य म्हणून आ.संजयमामा शिंदे यांनी योग्य मुल्यमापन करत पार्टीसाठी ज्यांनी खरेच प्रामाणीकपणे काम कले आहे त्यांनाच सधी द्यावी असे जाणकारांना वाटते.
माजी उपनगराध्यक्ष दादा गोरे,अजित रणसुभे,माजी नगरसेवक नितीन पवार,हरिश भराटे यांनी पार्टीसाठी प्रामाणीकपणे काम केले होते त्यामुळे यांची नावे सध्या स्विकृत सदस्य म्हणून चर्चेत आहेत.यावर संजयमामा शिंदे काय निर्णय घेणार हे लवकरच कळेल.


























