पिलीव – माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे मंगळवारी राञी दोनच्या सुमारास ऐन धनञयोदशी दिवशीच पाच ठिकाणी घरफोडया झाल्या यामध्ये जमीर तांबोळी यांच्या घराचा दरवाजा तोडुन घरातील कपाटात ठेवलेली रोख रक्कम एक लाख ञेचाळीस हजार, साडेतीन तोळे सोने व चांदीचे अकरा लहान दिवे असा एकुण तिन लाख चार हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरटय़ांनी लंपास केला .तर केशव वाघमारे यांच्या घरात राहणारे नोकरदार भाडेकरू यामध्ये एक तासगाव येथील व एक सोलापूर येथील भाडेकरू यांच्या घराचे दरवाजे तोडुन घरामध्ये गेले माञ
याठिकाणी या दोन्ही घरामधे चोरटय़ांच्या हाती काहीच लागले नाही.तसेच सागर तुंगळे यांच्या घराचा चोरट्यांनी दरवाजा उचकटून चोरीचा प्रयत्न केला मात्र याही ठिकाणी चोरटय़ांच्या हाती काहीच लागले नाही.तर भालचंद्र खरात हे दिवाळीनिमीत आपल्या गावी गेले होते .त्याच्याही घराचा दरवाजा उचकटून एक पाच हजार रुपये किमतीचे मनगटी घड्याळ, पैजण असा पंधरा हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरटयांनी लंपास केला.एकाच राञीत चोरट्यांनी तब्बल पाच ते सहा ठिकाणी घरफोड्या करण्याचा प्रयत्न केला .यामधे दोन ठिकाणी ऐवज चोरटय़ांच्या हाती लागला तर इतर ठिकाणी मात्र चोरीचा प्रयत्न फसला.एकाच राञीत एवढ्या मोठ्या प्रमाणात घरफोड्या झाल्यामुळे पिलीव परिसरातील नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे. सदर घटनेच्या चोरीच्या घटनेचा घटनास्थळी जाऊन हवालदार पंडित मिसाळ व पोलीस नाईक अमीत जाधव यांनी रीतसर पंचनामा केला.ह्या चोरीच्या घटनेचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक गोसावी हे करीत आहेत.


















