पंढरपूर – तालुक्यातील आगामी सण, उत्सव आणि यात्रांच्या अनुषंगाने गुन्हे करणारे पाच जणांना सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सोलापूर ग्रामीण, सोलापूर शहर आणि संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून तीन महिन्याकरिता तडीपार करण्याचे आदेश ६ फेब्रुवारी २०२६ रोजी निर्गमित केले आहेत.
दरम्यान सोमनाथ सलगर वय २४ वर्ष ,लक्ष्मण शिंदे वय २६ वर्ष, कृष्णा लेंगरे वय २२ वर्ष, जयदीप कांबळे २० वर्ष, कृष्णा घुटुकडे वय २५ वर्ष आणि विशाल मेटकरी वय २४ वर्ष (सर्व भटुंबरे शेगाव दुमाला ता. पंढरपूर) या पाच तडीपार इसमांना पंढरपूर तालुका पोलिसांनी ताब्यामध्ये घेऊन सोलापूर जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यातील पुणे या जिल्ह्यातील इंदापूर पोलीस ठाणे पुणे ग्रामीण या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये नेऊन सोडून तडीपारची आदेशाची प्रत प्रत्येक आरोपीला बजावून तडीपारीची कारवाई केलेली आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे, पोलीस निरीक्षक संजय जगताप नेमणूक एलसीबी सोलापूर ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर, पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले, विक्रम वडणे एपीआय विभावरी रेळेकर, उपनिरीक्षक दत्तात्रय तोंडले, पोलीस हवालदार इसाक सय्यद चंद्रकांत घंटे, बालाजी कदम, मंगेश रोकडे , एएसआय आबा शेंडगे सरगर, पोलीस हवालदार गावडे, सागर गवळी, व स्थानिक गुन्हे शाखा पो.हे.कॉ.अनिस शेख यांनी केली आहे.


























