सोलापूर – श्री कट्टेव्वादेवी गोशाळेत श्री राम जन्मभूमी अयोध्या येथील राम मंदिर शिखरावर भगवा सनातन धर्मध्वजारोहण निमित्त ध्वजारोहण कार्यक्रम करण्यात आले.
प्रथम गोमातेचे पूजन व आरती त्यानंतर श्रीराम प्रभू प्रतिमेचे पूजन आरती करून भगवा सनातन धर्मध्वजारोहण करण्यात आले. सर्वांना गोड प्रसाद वाटप करून गोमय उत्पादन भेट देण्यात आले.
या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष सुश्री उमा बिराजदार, सहाय्यक कृषी अधिकारी सौ कस्तुरे व मंडळ कृषीअधिकारी सौ अश्विनी शिंत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत व वडकबाळ येथील महिला बचत गटाच्या महिला सदस्य व गो सेवक श्री रुद्रप्पा बिराजदार, सिद्धाप्पा बिराजदार, महादेव बिराजदार, पिरप्पा बिराजदार, मल्लिनाथ बिराजदार आदी गोभक्त उपस्थित होते.



















