नवीन नांदेड प्रतिनिधी
गोपाळ चावडी ग्रामपंचायतच्या नव्याने निवड झालेल्या सरपंच सौ. सुरेखा प्रदीप लाखे यांच्या हस्ते दिनांक १५ ऑगस्ट २०२४ स्वातंत्र्यदिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालय येथे राष्ट्रीय ध्वजारोहण करण्यात आला.
नांदेड शहरजवळील व सिडको हडको परिसरातील गोपाळचावडी ग्रामपंचायत कार्यालय येथील सरपंच पदासाठी एक विशेष बैठकी दिनांक १४ ऑगस्ट रोजी घेऊन त्यात सदरील सरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. तत्कालीन सरपंच गिरजाबाई डाकोरे यांनी राजीनामा दिल्या नंतर निवडणूक घेऊन १४ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता नूतन सरपंच पदी सौ. सुरेखा प्रदीप लाखे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. यापूर्वी अडीच वर्षा अनुसूचित जाती महिला राखीवपदी असलेल्या यावेळी गिरजाबाई डाकोरे यांची निवड करण्यात आली होती. त्यानंतर कार्यकाळ संपल्याने पुढील अडीच वर्ष कालावधीसाठी ग्रामपंचायतने विशेष बैठक घेऊन सौ सुरेखा प्रदीप लाखे यांची नूतन सरपंच पदी निवड करण्यात आली
यावेळी पिठाशीन अधिकारी तथा मंडळ अधिकारी एच. एन. सुजले गावकर, तलाठी आर.एन भिंगोरे, ग्रामविकास अधिकारी पी.डी. उबाळे यांच्या उपस्थित निवड प्रक्रिया पार पडली यावेळी ग्रामपंचायतचे उपसरपंच साहेबराव सेलूकर यांच्यासह सर्व सदस्य व ग्रामस्थांची उपस्थित होते. सरपंच पदाची निवडून झाल्यानंतर लगेचच स्वातंत्र्यदिनानिमित्त नूतन सरपंच सौ. सुरेखा लाखे यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालय येथे राष्ट्रीय ध्वजारोहण करण्यात आले.